शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

मुल्ला फजलुल्लावर युनोचे निर्बंध

By admin | Updated: April 9, 2015 00:33 IST

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने पाकिस्तानचा तालिबान प्रमुख मुल्ला फजलुल्ला याच्यावर निर्बंध लागू केले आहेत. पेशावरमधील शाळेवर झालेल्या हल्ल्या

संयुक्त राष्टे : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने पाकिस्तानचा तालिबान प्रमुख मुल्ला फजलुल्ला याच्यावर निर्बंध लागू केले आहेत. पेशावरमधील शाळेवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार म्हणून त्याच्यावर दहशतवादी कृत्ये करणे आणि दहशतवादाला आर्थिक मदत करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंधाअंतर्गत फजलुल्ला (४०) याला अल काईदाच्या निर्बंधात समाविष्ट करण्यात आले असून, आता त्याची मालमत्ता जप्त केली जाईल. त्याला प्रवासबंदी, शस्त्रास्त्रे बाळगण्यासही बंदी घातली जाईल. तेहरिक-ए-तालिबान पाकचा कमांडर असणारा मुल्ला फजलुल्ला हा रेडिओ मुल्ला म्हणून प्रसिद्ध असून, पाकिस्तानच्या खैबर आदिवासी भागात गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. तो मरण पावल्याचेही अनधिकृत वृत्त त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. अमेरिकेने जानेवारी महिन्यात त्याला जागतिक दहशतवादी असे घोषित केले असून, त्याच्यावर निर्बंध लागू केले आहेत. सुरक्षा परिषदेने फजलुल्ला याचे नाव अल काईदाच्या यादीतील निर्बंधाअंतर्गत टाकले असून तेहरिक-ए-तालिबानमार्फत दहशतवादी कृत्ये करणे, त्यांचे नियोजन, आर्थिक तरतूद करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)