शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

रिपब्लिकन दावेदारांत ट्रम्प सर्वात पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 02:51 IST

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प सर्वात आघाडीवर असून त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी टेड क्रूज १४ टक्के

वॉशिंग्टन : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प सर्वात आघाडीवर असून त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी टेड क्रूज १४ टक्के पिछाडीवर आहेत. अलीकडेच झालेल्या एका पाहणीतून हे स्पष्ट झाले. बांधकाम व्यावसायिक असलेले ट्रम्प यांना संभाव्य प्राथमिक मतदारांपैकी ३४ टक्के लोकांचे समर्थन असून क्रूज यांना २० टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार फ्लोरिडाच्या सिनेटर मार्को रुबियो या एकमात्र दावेदार अशा आहेत, ज्यांची टक्केवारी दुहेरी अंकांची आहे. त्यांना ११ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. बेन कारसन ८ टक्के समर्थन घेत चौथ्या क्रमांकावर आहेत. काही दिवसांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात ट्रम्प ३५ टक्के मतदारांचा पाठिंबा मिळवत प्रथम क्रमांकावर होते, तर क्रूज २० टक्क्यांवर होते. टेक्सासचे सिनेटर असलेले क्रूज हे ट्रम्प यांचे राष्ट्रीय स्तरावरील एकमेव प्रतिस्पर्धी आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या विरुद्ध टिष्ट्वटरवर जोरदार हल्ला चढविला आहे. क्रूज इमानदार आहेत का? असा प्रश्न विचारीत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, त्यांचा वॉल स्ट्रीटशी संबंध असून त्यांना गोल्डमेन सॅक्स सिटी कमी व्याज दरावर कर्ज देत आहे. याचा कसलाही खुलासा करण्यात आलेला नाही. तसेच कसली संपत्ती विक्री झालेली नाही. अन्य एका टष्ट्वीटमध्ये त्यांच्या नागरिकत्वावर प्रश्न विचारले आहेत. ट्रम्प म्हणाले की, क्रूज यांनी कॅनडाचे नागरिकत्व सोडलेले नाही. त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दावेदारी केल्यानंतर असे केले. ते कॅनडाचे पंतप्रधान होऊ शकतात. त्यांना अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा कायदेशीर अधिकार नाही. ते आपल्या कर्जाचा खुलासा करीत नाहीत. (वृत्तसंस्था)