शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अर्जेंटिनात सापडले सर्वांत मोठ्या डायनोसॉरचे अवशेष

By admin | Updated: May 19, 2014 03:50 IST

येथील जीवाश्मतज्ज्ञांना पृथ्वीवरील सर्वांत मोठ्या डायनोसॉरचे अवशेष सापडले आहेत.

ब्यूनोस आयर्स : येथील जीवाश्मतज्ज्ञांना पृथ्वीवरील सर्वांत मोठ्या डायनोसॉरचे अवशेष सापडले आहेत. १३० फूट लांब, तर ६५ फूट उंचीच्या या डायनोसॉरचे वजन १४ आफ्रिकन हत्तींच्या वजनाएवढे आहे, असा निष्कर्ष जीवाश्म तज्ज्ञांनी काढला आहे. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी सापडलेल्या अर्जेंटिनासॉरपेक्षा याचे वजन सातपट अधिक आहे. सुमारे ९५ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या या डायनोसॉरचे हे अवशेष अर्जेंटिनातील पॅटागोनियाच्या पश्चिमेकडील वाळवंटी भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्रिलीव्ह या गावात सापडले. येथील स्थानिक शेतमजुराला २०११ मध्ये अपघाताने डायनोसॉरच्या अस्थी आढळल्या. त्रिलीव्ह गाव हे अर्जेंटिनाच्या दुर्गम भागात येते. ब्यूनोस आयर्सपासून १,३०० किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे हे गाव आहे. यानंतर येथे इग्डियो फेरुगलिओ या अर्जेंटिनाच्या जीवाश्म वस्तुसंग्रहालयाच्या वतीने खोदकाम हाती घेण्यात आले. डॉ. लुईस कार्बालिडो आणि डॉ. डिएगो पोल यांनी याच्या नेतृत्वाखाली हे काम पार पडले. शाकाहारी गटात मोडणार्‍या ७७ टन वजनाच्या या डायनोसॉरची मान २० मीटर म्हणजेच सात मजल्याच्या इमारतीएवढी उंच आहे. त्याच्या मांडीचे हाड पुरुषभर उंचीचे आहे. साडेनऊ ते दहा कोटी वर्षांपूर्वी या कालावधीत महाकाय डायनोसॉर अस्तित्वात होते. या डायनोसॉरच्या आतापर्यंत सुमारे २०० अस्थी आढळल्या असून त्या सर्व सुस्थितीत आहेत. अवशेष सापडलेल्या या डायनोसॉरचे अद्याप नामकरण करण्यात आले नाही, अशी माहिती अर्जेंटिनातील त्रिलीव्ह येथील प्राणिसंग्रहालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)