शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स करताना कंडोम न वापरल्याने बलात्काराचा गुन्हा

By admin | Updated: January 13, 2017 09:47 IST

सेक्स करताना कंडोम हटवणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं असून त्याच्याविरोधात महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे

ऑनलाइन लोकमत
बर्न, दि. 13 - सेक्स करताना कंडोम हटवणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं असून त्याच्याविरोधात महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली त्याला तुरुंगाची हवादेखील खावी लागण्याची शक्यता आहे. स्वित्झर्लंडमधील ही घटना आहे. या घटनेमध्ये एका व्यक्तीने सेक्स करताना आपल्या पार्टनरला न सांगताना कंडोम काढला होता. 
 
स्वित्झर्लंडमझील लौजेन येथील फौजदारी न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. आपल्या पार्टनरला कोणतीही कल्पना न देता कंडोम हटवणं बलात्कार करण्यासारखं असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. न्यायालयाने या 47 वर्षीय व्यक्तीला 12 महिन्यांसाठी निलंबित शिक्षा सुनावली आहे. याचा अर्थ या व्यक्तीला तात्काळ तुरुंगात टाकण्यात येणार नाही, मात्र पुढील 12 महिने त्याला नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान जर त्याने काही गुन्हा केला तर त्याला 12 महिन्यांचा तुरुंगवास होईल. 
 
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही व्यक्ती फ्रान्सची राहणारी आहे. डेटिंग अॅप 'टिंडर'च्या माध्यमातून त्याची या स्विस नागरिक महिलेशी ओळख झाली होती. जून 2015 मध्ये दोघांनी दुस-या भेटीनंतरच शरीरसंबंध ठेवण्यास सुरुवात केली होती. मात्र काही दिवसांनी आपला पार्टनर सेक्स करताना कंडोम वापरत नसल्याचं महिलेच्या लक्षात आलं. 
 
जर त्या महिलेला कंडोम वापरलं जात नसल्याची कल्पना असती तर कदाचित तिने सेक्स करण्यासाठी नकार दिला असता असं न्यायालयाचं म्हणणं आहे. स्वित्झर्लंडमधील ही अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याचं महिलेच्या वकिलाने सांगितलं आहे.