२१ व्या शतकातील दुसरे दशक सुरु होताच अरब जगतात सत्ताधाऱ्यांविरोधात लाट आली आणि यात ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त यासारख्या देशांत सत्तापालट झाला. मात्र, अनेक दशकांपासून सत्तेवर असलेल्या सौदी राजाविरोधात लक्षणीय असा असंतोष देशात उद्भवला नाही. याचे श्रेय ऐश्वर्य संपन्न, सुधारणावादी, अरब राष्ट्रवादी राजा शाह अब्दुल्ला यांना जाते.१८ अब्ज डॉलर एवढी गडगंज संपत्ती असलेले शाह अब्दुल्ला हे सर्वाधिक संपत्ती असलेल्या जगभरातील राष्ट्रप्रमुखांत तिसऱ्या क्रमांकावर होते. २००८ साली चीनच्या सिंचूआन प्रांताला भूकंपाचा हादरा बसला होता. या आपत्तीवेळी शाह अब्दुल्ला यांनी चीनला ५० दशलक्ष डॉलरची मदत दिली होती. कॅटरिना वादळानंतरही त्यांनी ३,००,००० डॉलरची मदत देऊ केली होती. आपल्या संपत्तीतून त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अन्न कार्यक्रमासही मदत दिली होती. यासाठी त्यांनी ५०० दशलक्ष डॉलरहून अधिकचे सहाय्य केले होते. शाह अब्दुल्ला यांनी २००५ मध्ये आपला सावत्र भाऊ आणि तत्कालीन राजे शाह फहद यांच्या मृत्यूनंतर सत्ता सुत्रे हाती घेतली होती. तथापि, १९९५ पासूनच ते सरकारची सूत्रे हाताळत होते. कारण, शाह फहद आपल्या आजारपणामुळे सरकार चालवण्यास सक्षम नव्हते.पाश्चात्यांशी ताळमेळजगातील सर्वाधिक परंपरावादी, रुढीग्रस्त देशांपैकी एक सौदी अरेबियाचे राजे शाह अब्दुल्ला यांनी पाश्चात्य देशांशी संबंध सुधार आणि देशांतर्गत आकांक्षा यात मोठा ताळमेळ घातला. सनातनी विचारात वाढलेले असतानाही एक सुधारणावादी राजा म्हणून ते ओळखले जात. आखातातील शांततेचे ते प्रखर समर्थक होते.अमेरिकेचे समर्थकशाह अब्दुल्ला यांच्या काळात अरब देशांत सौदी अरेबिया, अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. अलीकडेच सिरिया व इराकमधील इस्लामिक स्टेटविरोधात हवाई कारवाई करण्यासाठी अमेरिकी नेतृत्वाखाली आघाडीत सौदीने सहभाग घेतला होता.सर्वांत ज्येष्ठ राजमुकुटशाह अब्दुल्ला (९०) यांच्या मृत्यूनंतर ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या या जगातील वयाने सर्वांत ज्येष्ठ सम्राज्ञी झाल्या आहेत. राणी एलिझाबेथ यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी झाला असून सध्या त्या ८८ वर्षे वयाच्या आहेत. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांच्यांकडे राजपदाचा मान आला. शाह अब्दुल्ला बिन अब्दुल अजीज हे सौदी अरेबियातील एक सुधारणावादी राजा म्हणून ओळखले जातात. ते महिला हक्कांचे समर्थक होते. २०११ मध्ये त्यांनी महिलांना मतदान व स्थानिक निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला. एका मुलाखतीत त्यांनी मी महिला सक्षमीकरणाचा प्रखर समर्थक आहे, असे सांगताना त्यांनी आई, बहीण, मुली आणि पत्नीच्या स्त्रीत्वाचा विशेषत्वाने उल्लेख केला होता. अब्दुल्ला यांनी आपल्या तेल संपन्न देशाच्या माध्यामातून पश्चिम आशियाला एक खास आकार देण्यात मोठे योगदान दिले. ज्येष्ठ राजमुकुटअब्दुल्ला (९०) यांच्या मृत्यूनंतर ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या या जगातील वयाने सर्वांत ज्येष्ठ सम्राज्ञी झाल्या आहेत. राणी एलिझाबेथ यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी झाला आहे. असून सध्या त्या ८८ वर्षे वयाच्या आहेत. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांच्यांकडे राजपदाचा मान आला. ३० बायकांची ३५ अपत्येइब्न सूद हे सौदी राजघराण्याचे जनक म्हणून ओळखले जात. सौदी अरेबियाचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे राजा अब्दूल अजीज अल सूद यांच्या ३७ मुलांपैकी शाह अब्दुल्ला हे १३ व्या क्रमांकाचे पुत्र होते. सूद यांच्या १६ बायकांपैकी शाह अब्दुल्ला हे ८ व्या पत्नीचे अपत्य होते. शाह अब्दुल्ला यांनी अनेक पत्नीत्वाबाबत आपल्या पित्याचाच वारसा पुढे चालवला.३० बायका असलेल्या अब्दुल्लांना १५ मुले आणि २० मुली झाल्या. पित्याप्रमाणेच शाह अब्दुल्ला यांनी इस्लामच्या अभ्यासकांकडून धर्म, साहित्य व विज्ञान यांचे शिक्षण घेतले.