शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

वाचाळांच्या बंदोबस्तासाठी ‘मोदीं’वर दबाव आणा

By admin | Updated: May 1, 2015 01:51 IST

भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अल्पसंख्याकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांकडून होणारे ‘हिंसक हल्ले, बळजबरीचे धर्मांतर’ आणि घरवापसी मोहिमांना तोंड द्यावे लागत आहे,

वॉशिंग्टन : भारतात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अल्पसंख्याकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांकडून होणारे ‘हिंसक हल्ले, बळजबरीचे धर्मांतर’ आणि घरवापसी मोहिमांना तोंड द्यावे लागत आहे, असे अमेरिकी काँग्रेस आयोगाच्या अहवालात म्हटले.अल्पसंख्याकांबद्दल अवमानकारक टिपणी करणाऱ्या धार्मिक व राजकीय नेत्यांचे जाहीररीत्या कान टोचावेत, यासाठी ओबामा प्रशासनाने भारत सरकारवर दबाव आणावा, असेही यात सुचविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकी आयोगाचा २०१५चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या मानकांना चालना देण्याचा तेथील सरकारने प्रयत्न करावा, असे यात म्हटले आहे. ‘भारताची बहुसांस्कृतिक व सामाजिक लोकशाही अशी प्रतिमा असली तरी दीर्घकाळापासून अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यासाठी किंवा गुुन्ह्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत झगडत आहे. धार्मिक हिंसाचार, धार्मिक उद्देशाने प्रेरित घटनांच्या संख्येत वाढ होण्याचे हे सलग तिसरे वर्ष असल्याचेही अहवालात म्हटले. निवडणुकीनंतर सत्ताधारी भाजपशी संबंधित नेते अल्पसंख्याक समुदायांबाबत अवमानकारक वक्तव्ये करत आहेत, तसेच अल्पसंख्याकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेसारख्या हिंदू राष्ट्रवादी संघटनांकडून होणारे बळजबरीचे धर्मांतर आणि हिंसक हल्ल्यांना तोंड द्यावे लागत आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. डिसेंबर २०१४ मध्ये हिंदू संघटनांनी घर वापसी कार्यक्रमांतर्गत उत्तर प्रदेशात ४००० ख्रिश्चन कुटुंबे व एक हजार मुस्लिम कुटुंबियांना बळजबरीने पुन्हा हिंदू करण्याची घोषणा केली होती. (वृत्तसंस्था) एक मुस्लिम व एका ख्रिश्चन धर्मीयाला पुन्हा हिंदू बनविण्यासाठी प्रति व्यक्ती दोन ते पाच लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगून या हिंदू संघटनांनी या कार्र्यक्रमापूर्वी निधी गोळा करण्याची मोहीम सुरू करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, देशातून तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र टीका होऊ लागल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला, असे संघाचे नेते मोहन भागवत यांनी म्हटले असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ४आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, ओडिशा, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानात धार्मिक उद्देशाने प्रेरित हल्ले आणि हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. ४२०१४च्या निवडणुकीपूर्वीच धर्माच्या आधारावर भेदाभेद निर्माण करण्याची मोहीम सुरू झाली होती. मुस्लिम, ख्रिश्चन व शीख समुदायांसह इतर धार्मिक नेते आणि बिगरसरकारी संघटनांनीही या मोहिमेला हातभार लावला.