शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

गधीमाईतील पशुहत्येच्या प्रथेवर अखेर बंदी

By admin | Updated: July 29, 2015 01:42 IST

नेपाळच्या गधीमाई उत्सवामध्ये जनावरांचा बळी देण्याच्या ३०० वर्षे जुन्या प्रथेवर बंदी घालण्यात आली असून यामुळे लाखो मुक्या जिवांचे प्राण वाचणार आहेत.

नवी दिल्ली : नेपाळच्या गधीमाई उत्सवामध्ये जनावरांचा बळी देण्याच्या ३०० वर्षे जुन्या प्रथेवर बंदी घालण्यात आली असून यामुळे लाखो मुक्या जिवांचे प्राण वाचणार आहेत. दर पाच वर्षांनी होणारा हा उत्सव पशुहत्येचा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असतो. गधीमाई मंदिर विश्वस्त मंडळाने मंगळवारी पशुहत्येवर बंदीचा निर्णय घोषित करून सर्व भाविकांना सोबत जनावरे न आणण्याचे आवाहन केले. आम्ही पशुहत्येची प्रथा थांबविण्याच्या औपचारिक निर्णयाची घोषणा करत आहोत. तुमच्या सहकार्याने २०१९चा महोत्सव रक्तपातापासून मुक्त ठेवू. त्याचप्रमाणे हा महोत्सव पशुहत्येचा नव्हे, तर जीवनाचा उत्सव ठरावा यासाठी प्रयत्न करू, असे मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे. लोक अनेक पिढ्यांपासून चांगल्या आयुष्यासाठी आई गधीमाईला पशुंचा बळी देत आले आहेत; परंतु ही प्राचीन परंपरा बदलण्याची वेळ आली आहे. हत्या व हिंसाचाराऐवजी शांततापूर्ण पद्धतीने उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. प्राणिहक्क संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या संघटना गधीमाई उत्सवातील पशुहत्येविरुद्ध लढा देत होत्या. दयाभावाचा हा सर्वात मोठा विजय असून यामुळे अगणित प्राण्यांचे प्राण वाचणार आहेत. मंदिर समितीच्या या निर्णयाची आम्ही प्रशंसा करतो; परंतु लोकांना ही बाब समजून सांगण्याची फार मोठी जबाबदारी आमच्यावर असल्याची आम्हाला जाणीव आहे. पशूंचा बळी देण्याची रीत ही आम्हाला मागे नेणारी असून आधुनिक जगातील एकाही देशाने या रितीला थारा देऊ नये, असे अ‍ॅनिमल वेलफेअर नेटवर्क नेपाळचे संस्थापक सदस्य व गधीमाई उत्सवाविरुद्ध आवाज उठविणारे मनोज गौतम यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)