शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या गोळीबारात २ मधेशी निदर्शक ठार

By admin | Updated: November 22, 2015 23:53 IST

दक्षिण नेपाळमधील एका प्रमुख महामार्गावर मधेशी आंदोलकांनी केलेली नाकेबंदी सक्तीने उठविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान २ जण ठार आणि अन्य कित्येक जण जखमी झाले.

काठमांडू : दक्षिण नेपाळमधील एका प्रमुख महामार्गावर मधेशी आंदोलकांनी केलेली नाकेबंदी सक्तीने उठविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किमान २ जण ठार आणि अन्य कित्येक जण जखमी झाले.नेपाळमध्ये नवीन धर्मनिरपेक्ष घटना लागू झाल्यापासून मधेशी निदर्शकांनी दक्षिण नेपाळमध्ये भारतीय सीमेवर आंदोलन सुरू करून नाकेबंदी केली आहे. त्यामुळे भारतातून नेपाळला जीवनावश्यक वस्तंूचा आणि औषधींचा पुरवठा थांबला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ही परिस्थिती आहे.शनिवारी उशिरा रात्री सपतारी जिल्ह्यातील पूर्व-पश्चिम राजमार्गावर नाकेबंदी करणाऱ्या ‘युनायटेड डेमोक्रॅटिक मधेशी फ्रंटच्या’ कार्यकर्त्यांना हटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तेव्हा या निदर्शकांनी त्यांच्यावर पेट्रोल बॉम्ब आणि दगड-विटांनी हल्ला केला. त्यामुळे गोळीबार करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले. आता या मार्गावरून वाहनांची सुरक्षित वाहतूक व्हावी म्हणून तेथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.पोलिसांचा गोळीबार आणि निदर्शकांची दगडफेक यात किमान १७ निदर्शक आणि २५ पोलीस जखमी झाले. पाच निदर्शक आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. जवळपास २,५०० निदर्शकांनी पोलिसांवर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.