शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी धाड टाकताच बॉम्बस्फोट, १० जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2016 03:28 IST

इजिप्तमध्ये पोलिसांनी अपार्टमेंटवर धाड टाकल्यानंतर इस्लामिक स्टेटशी (इसिस) संबंधित अतिरेक्यांनी तेथे बॉम्बस्फोट घडवून आणले. या हल्ल्यात सात पोलिसांसह दहा ठार, तर २० जण जखमी झाले.

कैरो : इजिप्तमध्ये पोलिसांनी अपार्टमेंटवर धाड टाकल्यानंतर इस्लामिक स्टेटशी (इसिस) संबंधित अतिरेक्यांनी तेथे बॉम्बस्फोट घडवून आणले. या हल्ल्यात सात पोलिसांसह दहा ठार, तर २० जण जखमी झाले. अल-हराम जिल्ह्यातील प्रसिद्ध गीझा पिरॅमिडस्जवळ गुरुवारी हा बॉम्बस्फोट झाला. दहशतवाद्यांनी एका सदनिकेला अड्डा बनविल्याच्या संशयामुळे पोलिसांनी तेथे धाड टाकली होती. इसिसशी संलग्नित इजिप्शियन दहशतवादी संघटना अन्सार बैत अल मकदेसने शुक्रवारी या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. सिनाई येथील या संघटनेने आपल्या वेबसाईटवर तसे निवेदन पोस्ट केले आहे. आपणच टीप देऊन पोलिसांना बॉम्ब पेरून ठेवलेल्या सदनिकेत घेऊन आलो होतो. पोलीस सदनिकेत येताच बॉम्बस्फोट झाले, असे या संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे. तथापि, गृहमंत्रालयाने स्फोटामागे बडतर्फ राष्ट्राध्यक्ष मोहंमद मुर्सी यांच्या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा हात असल्याचे सांगितले. मुस्लिम ब्रदरहुडचा एक गट बॉम्ब बनविण्यासाठी या सदनिकेचा वापर करीत होता, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. लष्कराने मुर्सी यांना राष्ट्राध्यक्षपदावरून खाली खेचल्यापासून अल-हरामने अनेक हल्ले घडवून आणले आहेत. मुर्सींच्या बडतर्फीपासून दहशतवादी सातत्याने पोलीस कर्मचारी आणि सैनिकांवर हल्ले करीत आहेत. (वृत्तसंस्था)