शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

अपत्य असणारे लोक अधिक जगतात

By admin | Updated: March 16, 2017 00:58 IST

मुले असल्यास तुमचे आयुष्य दोन वर्षांनी वाढते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.

लंडन : मुले असल्यास तुमचे आयुष्य दोन वर्षांनी वाढते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. मुले आणि मुली पालकांची मने सक्रिय ठेवण्यासह उतारवयात त्यांची अतिरिक्त काळजी घेतात. त्यामुळे मुले असणारे लोक मुले नसणाऱ्यांच्या तुलनेत अधिक जगतात, असे संशोधकांनी सांगितले. संशोधकांनी ७०४४८१ पुरुष आणि ७२५२९० महिलांची वैवाहिक स्थिती, त्यांच्या अपत्यांची संख्या आणि अपत्यांचे लिंग यांचे विश्लेषण करून वरील निष्कर्ष काढला. अपत्य असलेल्या ६० वर्षीय व्यक्तीचे उर्वरित आयुर्मान निपुत्रिक व्यक्तींच्या तुलनेत जवळपास एक वर्ष १० महिन्यांनी अधिक म्हणजे २०.२ वर्ष होते. याचाच अर्थ असा की मुलेबाळे असलेल्या व्यक्ती १ वर्ष १० महिने अधिक जगतात. महिलांच्या बाबतीत हा फरक २४.६ वर्ष आणि २३.१ वर्ष म्हणजेच दीड वर्षाचा आहे. ६० वर्षांच्या वयाच्या निपुत्रिक व्यक्तीचे वर्षभरात मृत्यू येण्याचे प्रमाण अपत्य असलेल्या व्यक्तींहून ०.०६ टक्क्यांनी अधिक होते. अपत्य असलेल्या आणि निपुत्रिक या दोन्ही व्यक्ती नव्वदीत गेल्यानंतर हा फरक १.४७ टक्क्यांनी वाढतो. या वयात ते पूर्णपणे त्यांच्या पुढील पिढीवर अवलंबून असतात. मुले असण्याचा दीर्घायुष्याशी निकटचा संबंध आहे, असे या अभ्यासाचे प्रमुख डॉ. कारीन मोदिग यांनी सांगितले. गर्भारपणाचा महिलांच्या संप्रेरकांवर परिणाम होऊन त्यांना कर्करोगासह विविध आजार होण्याचा धोका कमी होतो, असेही ते म्हणाले.