शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेच्या विमानवाहू जहाजांची गस्त, चीन संतप्त

By admin | Updated: February 19, 2017 16:39 IST

अमेरिकेच्या नौदलानं दक्षिण चिनी समुद्रात विमानवाहू जहाजांद्वारे गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 19 - दक्षिण चीन समुद्रातील अतिक्रमणावरून चीनच्या वाढत्या हस्तक्षेपावर अनेक देशांनी विरोध दर्शवला असतानाच आता अमेरिकेच्या नौदलानं दक्षिण चिनी समुद्रात विमानवाहू जहाजांद्वारे गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच चीननं अमेरिकेच्या दक्षिण चिनी समुद्रातील टेहळणीला विरोध केला आहे. दक्षिण चीन समुद्रात आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेला दिला आहे. यूएसएस कार्ल विन्सन या लढाऊ विमानवाहू जहाजानं अमेरिकेनं दक्षिण चिनी समुद्रात शनिवारपासून गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. विन्सनच्या फेसबूक पेजवरच याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. स्ट्राईक ग्रुपचे कमांडर रिअर ॲडमिरल जेम्स किलबी म्हणाले, पॅसिफिक समुद्रातील प्रशिक्षण अमेरिकेच्या नौदलासाठी उपयुक्त आहे. इंडो-एशिया-पॅसिफिक या संपूर्ण भागातील मित्रांशी आम्हाला चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. वन चायना पॉलिसीच्या माध्यमातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालवला असल्यानेच अमेरिका आणि चीन यांच्यात पुन्हा दक्षिण चिनी समुद्राच्या मालकी हक्कावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. तसेच या विषयावरून दोन्ही देशांतील संबंध अधिक बिघडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दक्षिण चिनी समुद्रात चीननं कृत्रिम बेट निर्माण केले असून, नौदलाचे प्रशिक्षण शिबिर सुरू केले आहे. या दक्षिण चीनच्या बेटावरून चीनचा दरवर्षी 5 लाख कोटींचा व्यवहार होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मच्छीमारी होत असून, नैसर्गिक वायू, कच्चे तेलही उपलब्ध होते. ब्रुनेई, मलेशिया, फिलिपिन्स, तैवान, व्हिएतनाम या देशांचा दक्षिण चिनी समुद्रातील मालकी हक्कावरून वाद सुरू आहे. तसेच चीन या बेटाचा वापर लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी करत असून, इतर देशांच्या हद्दीत चीन अतिक्रमण करत असल्यानं अमेरिकेनं चीनला इशारा दिला आहे.