शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे हेलिकॉप्टर आम्हीच क्षेपणास्त्राने पाडले

By admin | Updated: May 10, 2015 23:42 IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आम्ही जमिनीवरून हवेत हल्ला करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राने हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा पाकिस्तानी तालिबान्यांनी रविवारी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये केला आहे.

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये आम्ही जमिनीवरून हवेत हल्ला करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राने हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा पाकिस्तानी तालिबान्यांनी रविवारी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये केला आहे. तालिबानचे अतिरेकी हवेत हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रासह त्यात दिसत आहेत. तालिबानच्या दाव्यानुसार या क्षेपणास्त्राने त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या हेलिकॉप्टरला शुक्रवारी पाडले. यात नॉर्वे आणि फिलिपाईन्सच्या राजदूतांसह सात जण ठार झाले.हा व्हिडिओ जिहादी फोरमने प्रसिद्धीस दिला असून, त्यात चेहरा झाकलेले किमान चार अतिरेकी जमिनीवरून हवेत हल्ला करू शकणारे क्षेपणास्त्र एसएएम-७ बीसह दिसतात. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तानच्या नलतार खोऱ्यात एमआय १७ हेलिकॉप्टरला खाली पाडण्यासाठी या क्षेपणास्त्राचा वापर केला गेला होता. व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी उर्दू भाषेत असलेल्या संदेशात तालिबान्यांचा दावा असा आहे की, हे क्षेपणास्त्र हेलिकॉप्टर वळण घेत असताना त्याच्या मागच्या भागावर लागले व त्यामुळेच ते हवेत नष्ट झाले. हे हेलिकॉप्टर पाडण्यासाठी तीन किलोमीटर दूर अंतरावरून क्षेपणास्त्र सोडण्यात आले होते, असेही संदेशात म्हटले आहे. परराष्ट्र सचिव अजीज चौधरी यांनी शनिवारी तालिबानचा वरील दावा फेटाळला व हेलिकॉप्टरचे इंजिन बिघडल्यामुळे ते कोसळल्याचे प्रारंभिक चौकशीत दिसते, असेही म्हटले होते.सरकार कोणता दावा करते यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही, असे तालिबानने निवेदनात म्हटले आहे. दुर्घटनेनंतर टीटीपीचे मुख्य प्रवक्ते मुहम्मद खुरसानी यांनी दावा केला की, हेलिकॉप्टरला विमानभेदी क्षेपणास्त्राने पाडण्यात आले व त्यात पायलटसह काही विदेशी राजदूतांचा मृत्यू झाला. तहरिक- ए- तालिबान पाकिस्तानच्या विशेष गटाने नवाज शरीफ यांच्या दौऱ्यात त्यांना लक्ष्य करण्याची खास योजना तयार केली होती; परंतु ते दुसऱ्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करीत होते म्हणून वाचले, असेही खुरासानी म्हणाले. तथापि, पाकिस्तानी लष्कराने अतिरेकी किंवा दहशतवादी कारवायांचा या प्रकरणात इन्कार केला असून हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याचा दावा केला आहे.> रशियन बनावटीचे एसएएम-७ किंवा एसएएम-७ बी लक्ष्यावर तीन किलोमीटर अंतरावरून हल्ला करू शकते. अतिरेकी गटांच्या कारवायांवर लक्ष असलेल्या अमेरिकेतील एसआयटीई इंटेलिजन्स ग्रुपने आपल्या संकेतस्थळावर हा व्हिडिओ टाकला आहे. तालिबानने रविवारी निवेदनात ‘अल्लाच्या कृपेमुळे आम्ही असे आणखी हल्ले करू’ असे म्हटले. हे हेलिकॉप्टर आम्ही पाडल्याचा दावा केलेल्या तालिबान्यांनी आमचे लक्ष्य पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ होते, असेही म्हटले.