शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पाकचा प्रताप, नेपाळमधील भूकंपग्रस्तांना मदतीमध्ये दिले गोमांस

By admin | Updated: April 30, 2015 14:03 IST

भूकंपग्रस्त नेपाळमध्ये जगभरातून मदतीचा ओघ सुरु असून पाकिस्तानने मात्र भूकंपग्रस्तांना मदत म्हणून चक्क गोमांस पाठवल्याने वाद निर्माण झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

काठमांडू, दि. ३० - भूकंपग्रस्त नेपाळमध्ये जगभरातून मदतीचा ओघ सुरु असून पाकिस्तानने मात्र भूकंपग्रस्तांना मदत म्हणून चक्क गोमांस पाठवत नेपाळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रताप केला आहे. सर्वाधिक हिंदू असलेल्या नेपाळमध्ये गाय ही पवित्र मानली जाते व गोमांस पाठवून पाकिस्तानने नेपाळच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिक नेपाळींनीही ही अन्नाची पाकिटं स्वीकारण्यास नकार दिला आहे.  

गेल्या आठवड्यात शनिवारी  आलेल्या भीषण भूकंपात नेपाळमध्ये सुमारे पाच हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भूकंपामुळे काठमांडूसह ग्रामीण भागांमधील जनजीवन विस्कळीत असून भारतासह विविध देश नेपाळमध्ये मदतकार्य करत आहे. पाकिस्ताननेही नेपाळमध्ये अन्नाची पाकिटं, ब्लॅंकेट व अन्य वस्तू मदत म्हणून पाठवल्या आहेत. मात्र पाकने अन्नाच्या पाकिटात थेट गोमांस पाठवल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. 

नेपाळमध्ये मदतकार्यासाठी गेलेल्या दिल्लीतील डॉक्टरांच्या चमूने ही माहिती दिली आहे. मंगळवारी पाकिस्तानने नेपाळमध्ये अन्नाची पाकिट पाठवली होती. ही खाद्यसामग्री घेण्यासाठी या डॉक्टरांचे पथक विमानतळावर गेले होते. पण यामध्ये गोमांस असलेले बीफ मसाल्याची रेडी टू इट पाकिट आढळली. डॉक्टरांनी ही पाकिट स्वीकारली नाहीत. सुरुवातीला स्थानिकांनाही या पाकिटांमध्ये नेमके काय आहे हे माहित नव्हते. मात्र त्यांना सत्यपरिस्थिती समजताच त्यांनी ही पाकिटं परत केली असे एका डॉक्टराने इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले आहे. 

नेपाळ सरकारनेही याची दखल घेतली असून या पाकिटात नेमके काय होते याचा तपास सुरु आहे. यामध्ये गोमांस आढळल्यास आम्ही राजनैतिक पातळीवर पाकसमोर हा मुद्दा मांडू असे नेपाळमधील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.