शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने लख्वीच्या पुन्हा मुसक्या बांधल्या

By admin | Updated: December 30, 2014 23:49 IST

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याला मंगळवारी सहा वर्षांपूर्वीच्या एका अपहरण प्रकरणात अटक करण्यात आली.

इस्लामाबाद : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याला मंगळवारी सहा वर्षांपूर्वीच्या एका अपहरण प्रकरणात अटक करण्यात आली. त्यामुळे त्याची सुटका टळली. सार्वजनिक सुरक्षा कायद्याखालील त्याची स्थानबद्धता पाकिस्तानी न्यायालयाने सोमवारी निलंबित केल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. यावरून भारताने खडे बोल सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर पाकने लख्वीचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद केला. सुटका होण्यापूर्वीच लख्वीला मोहंमद अन्वर नामक एका व्यक्तीचे अपहरण केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. यासंदर्भातील प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) सोमवारी इस्लामाबाद येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मुंबई हल्ल्याप्रकरणी लख्वीविरुद्ध ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत एका न्यायालयाने त्याला १८ डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला होता. पेशावरमध्ये शाळेवर हल्ला होऊन काही दिवस उलटत नाही तोच मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराला जामीन मिळाल्यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी भूमिकेवरच प्रश्नचिन्ह लागले होते. भारतासह जगभरातून पाकिस्तानवर टीका झाली होती. त्यामुळे पाक सरकारने सार्वजनिक सुरक्षा अबाधित राखण्याच्या आदेशातहत (एमपीओ) त्याला तीन महिन्यांसाठी स्थानबद्ध केले होते. त्यानंतर लख्वीने एमपीओखालील आपल्या स्थानबद्धतेस इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने सरकारी वकिलाच्या अनुपस्थितीत लख्वीच्या आव्हान याचिकेवर सुनावणी करताना एमपीओखाली त्याला स्थानबद्ध करण्याची सरकारची अधिसूचना निलंबित करून सुटकेसाठी त्याला दहा लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका भरण्याचे आदेश दिले होते. या घडामोडीवर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. (वृत्तसंस्था)४लख्वीवर अपहरणाचा आरोप ठेवण्यात आल्यानंतर त्याला रावळपिंडी येथील अदियाला कारागृहातून बाहेर काढून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर लख्वीला अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. ४लख्वीविरुद्ध गोलरा पोलीस ठाण्यात काल अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणावरून आम्ही त्याला त्या पोलीस ठाण्यात ठेवू शकत नाही, असे पाकिस्तानच्या गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. झकी-उर-रहमान लख्वीला न्यायालयातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अज्ञात ठिकाणी हलविण्यात आले.