शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान तोंडघशी!

By admin | Updated: September 23, 2016 06:34 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ काश्मीरच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रात पूर्णत: तोंडघशी पडले असून, काश्मीर प्रश्नी हस्तक्षेप करण्याची नवाझ शरीफ यांची मागणी संयुक्त राष्ट्राचे महासचिव

संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ काश्मीरच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रात पूर्णत: तोंडघशी पडले असून, काश्मीर प्रश्नी हस्तक्षेप करण्याची नवाझ शरीफ यांची मागणी संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी थेट फेटाळूनच लावली आहे. पाकिस्तानसाठी हा मोठाच झटका आहे.नवाझ शरीफ यांनी काश्मीरमध्ये भारत सरकारतर्फे मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप केल्यानंतर भारतानेही संयुक्त राष्ट्रामध्येच त्यांना सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तान हा दहशतवादी देश असून, दहशतवादाला पुरस्कृत करण्याचे पाकिस्तानचे जे जुने धोरण आहे त्यातून पाकिस्तान भारताविरोधात युद्धसदृश गुन्हे करीत आला आहे, असे भारताने म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर संयुक्त राष्ट्राने ज्यांना दहशतवादी घोषित केले आहे असे दहशतवादी पाकिस्तानच्या रस्त्यांवर राज्यकर्त्यांच्या पाठिंब्याने उघडपणे फिरत आहेत आणि त्यांना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान मदत करीत आहे, असे भारताने म्हटले आहे. मानवी हक्काचे सर्वांत वाईट उल्लंघन कुठले असेल तर तो दहशतवाद आहे, असे संयुक्त राष्ट्रातील भारताच्या कायम सचिव इनाम गंभीर म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतीच्या स्वरुपात मिळणाऱ्या अब्जावधी डॉलर्सचा उपयोग पाकिस्तानकडून तेथील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी केला जात असल्यामुळेच पाकिस्तानला आम्ही दहशतवादी देश मानतो, असे भारताने स्पष्ट केले.हस्तक्षेपाची मागणी फेटाळून लावताना, भारत आणि पाकिस्तानने परस्परांशी चर्चा करुन काश्मीरसह अन्य वादांवर तोडगा शोधावा, असा सल्ला बान की मून यांनी नवाझ शरीफ यांना दिला. बान की मून यांनी हस्तक्षेपाची मागणी फेटाळल्यानंतरही शरीफ यांनी मून यांच्या वक्तव्यांचे स्वागत केले. काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवण्याची गरज आहे, असे सांगून भारताने चचेर्साठी अनावश्यक अटी ठेवल्याची तक्रार त्यांनी केली. काश्मीरचा मुद्दा सोडवला जात नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानात शांतता नांदणार नाही, असाच जुनाच सूर त्यांनी आळवला.विमानसेवा खंडित?भारतीय लष्कराच्या विशेष जवानांनी बुधवारी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून २0 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आणि त्या वेळी अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त एका वेबसाइटने दिले होते. केंद्र सरकारकडून वा लष्कराच्या कोणत्याही सूत्रांकडून त्याला दुजोरा मिळाला नाही. मात्र या वृत्तानंतर पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाइन्सनं उत्तर पाकिस्तानमधल्या शहरांतील विमानसेवा रद्द केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधली गिलगिट आणि स्कर्डूची सेवा खंडित केल्याची माहिती त्या वेबसाइटने दिली आहे.