शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

पाकिस्तानला दहशतवादी देश जाहीर करा, अमेरिकन काँग्रेसमध्ये आणले विधेयक

By admin | Updated: September 21, 2016 10:47 IST

संयुक्त राष्ट्रामध्ये काश्मीर मुद्यावर पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे.

ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. २१ - संयुक्त राष्ट्रामध्ये काश्मीर मुद्यावर पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. दोन अमेरिकन खासदारांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी विधेयक मांडले आहे. 
 
पाकिस्तान फक्त अविश्वास पात्र सहकारीच नाहीय तर, पाकिस्तानने अमेरिकेच्या शत्रूंना अनेक वर्ष मदत केली आहे असे दहशतवाद विरोधातील उपसमितीचे चेअरमन टेड पोई यांनी सांगितले. पाकिस्तानने ओसामा बिन लादेनला आश्रय दिला. हक्कानी नेटवर्क बरोबर त्यांचे संबंध आहेत. त्यामुळे दहशतवादाच्या लढाईत पाकिस्तान कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होते असे पोई म्हणाले. 
 
दाना रोहराबाचेर आणि टेड पोई या दोन रिपब्लिकन सदस्यांनी हे विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडले. उरी दहशतवादी हल्ल्यावरुन अमेरिकेने आधीच पाकिस्तानला फटकारले आहे. रशियानेही पाकिस्तान बरोबरचा संयुक्त युद्ध सराव रद्द केला आहे. 
 
कुटुनितीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या भारताच्या रणनितीला यश मिळत आहे. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेमध्ये काश्मीर मुद्यावरुन भारताला घेरण्याची  पाकिस्तानची रणनिती आहे. त्यासाठी पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र पाकिस्तान आता एकाकी पडले आहे.