शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गणेश सजावट स्पर्धेचं आखाती देशांत आयोजन

By admin | Updated: September 17, 2015 03:46 IST

आखातामध्ये भारतीय व विशेषत: मराठी नागरिक मोठ्या संख्येने असून तिथेही घराघरांत गणेशोत्सव साजरा केला जातो. या आखाती देशातील गणेशभक्तांसाठी आखातीमराठीडॉटकॉम

ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. १७ - आखातामध्ये भारतीय व विशेषत: मराठी नागरिक मोठ्या संख्येने असून तिथेही घराघरांत गणेशोत्सव साजरा केला जातो. या आखाती देशातील गणेशभक्तांसाठी आखातीमराठीडॉटकॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार म्हणजे १७ सप्टेंबरपासून ते २६ सप्टेंबरपर्यंत कुवेत, ओमान, कतार, बहारीन, सौदी अरेबिया या देशांसह संयुक्त अरब अमिरातीतील  सर्व आखातीकरांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याचे स्पर्धा संयोजक समितीच्या अबोली कर्णिक व हर्षा चांदे यांनी सांगितले.
गेली काही वर्षे आखाती देशांमध्ये त्यातही प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती व ओमान या ह्या देशांमध्ये घरी गणपती आणण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीचे मखर किंवा सजावट करण्याकडे देखील लोकांचा कल  वाढू लागला आहे. २०१३ साली आखाती मराठी तर्फे अशा प्रकरच्या सजावट स्पर्धेचे प्रथम आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मिळालेला उत्कृष्ट असा प्रतिसाद पाहून यंदा स्पर्धेचे स्वरूप थोडे व्यापक आणि भव्य असे करण्यात आले आहे.
www.ganeshsajavat.aakhatimarathi.com या वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करून आखातीकर या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना  घरातील गणपती सजावटीचे फोटो ह्या साईटवर अपलोड करायचे आहेत. या फोटोंना फेसबुकवर किती लाईक्स मिळतात. त्याचबरोबर किती शेअर केले जातात यासोबतच परीक्षकांच्या मतानुसार स्पर्धेतील विजेते निवडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाची लोकप्रियता वाढत असताना उत्सव यतासांग व विधीवत पार पडावा यासाठी आखातीमराठी पूजा कशी करावी, साहित्य काय लागतं याचं मार्गदर्शन ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचबरोबर पारंपारिक आरती संग्रह देखील उपलब्ध करण्यात आला आहे.