शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

फक्त आवाजावर हॅक केला जाऊ शकतो तुमचा स्मार्टफोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 14:50 IST

संशोधकांनी अशा एका त्रुटीची माहिती मिळवली आहे ज्यामध्ये डिव्हाइस फक्त अ‍ॅक्सेलेरोमीटरच्या माध्यमातून हॅक केलं जाऊ शकतं

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - यूनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन आणि यूनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कैरलाइनामधील संगणक सुरक्षा संशोधकांनी अशा एका त्रुटीची माहिती मिळवली आहे ज्यामध्ये डिव्हाइस फक्त अ‍ॅक्सेलेरोमीटरच्या माध्यमातून हॅक केलं जाऊ शकतं. अ‍ॅक्सेलेरोमीटर्स स्मार्टफोन, फिटनेस मॉनिटर्स आणि वाहनांमध्ये वापरलं जात. अ‍ॅक्सेलेरोमीटरच्या मदतीने कोणत्याही फिरत्या किंवा वायब्रेटिंग वस्तूचा प्रवेग मापला जातो.
 
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी फिटबिट फिटनेस मॉनिटरमध्ये जाणुनबुजून चुकीच्या स्टेप्सची नोंद केली. यानंतर अ‍ॅक्सेलेरोमीटरला कंट्रोल करण्यासाठी स्मार्टफोनच्या स्पीकरमध्ये एक संशयित म्यूझिक फाईल प्ले केली. यामध्ये त्यांना स्मार्टफोन अवलंबून असणा-या सॉफ्टवेअरसोबत छेडछाड करण्याची संधी मिळाली. संशोधकांनी याचप्रमाणे रिमोट कंट्रोलवरील खेळण्याची गाडीला नियंत्रित करणा-या अॅपसोबतही छेडछाड करण्यात यश मिळवलं. 
 
संशोधक केविन फ्यू यांनी सांगितलं आहे की, 'काही शब्द टाकून कमांड एंटर केल्यानंतर फोन शटडाऊन केला जाऊ शकतो. याला म्यूझिकल व्हायरसही म्हणू शकतो'. 
 
संशोधकांनी पाच वेगवेगळ्या कंपन्यांची चीप वापरणा-या 20 कमर्शिअल ब्रॅण्ड्सच्या अर्धाहून जास्त स्मार्टफोनमध्ये हा दोष असल्याचं सांगितलं आहे. सध्याच्या घडीला अनेक कंपन्या सेल्फ ड्रायव्हिंग कार आणि ट्रॅक वैगेरे बनवण्यात व्यस्त आहेत. अशावेळी जर एखादी त्रुटी राहिली तर लांब बसून एखाद्याच्या वाहनाचा ताबा घेऊन नियंत्रित केलं जाऊ शकतं. 'ही अत्यंत गंभीर चूक नसली तरी यामुळे सायबर सेक्यूरिटीमध्ये किती मोठी त्रुटी आहे हे समोर येत असल्याचं', संशोधकांनी सांगितलं आहे.