शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

इसिसकडून महिलांची आता आॅनलाइन विक्री

By admin | Updated: July 7, 2016 04:08 IST

इस्लामिक स्टेटचे (इसिस) दहशतवादी गुलाम बनविण्यात आलेल्या महिलांची आता ‘व्हॉटस् अ‍ॅप’ व‘टेलिग्राम’ यासारख्या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून विक्री करीत असल्याचे समोर आले आहे.

खानकी : इस्लामिक स्टेटचे (इसिस) दहशतवादी गुलाम बनविण्यात आलेल्या महिलांची आता ‘व्हॉटस् अ‍ॅप’ व‘टेलिग्राम’ यासारख्या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून विक्री करीत असल्याचे समोर आले आहे.क्रौर्य व अमानुषतेच्या सर्व सीमा ओलांडत इसिसने या महिलांचा बाजार मांडला असून, ते अल्पवयीन मुलींचीही आता आॅनलाईन विक्री करीत आहेत. यासाठी ते गुलाम महिला- मुलींची छायाचित्रे, त्यांच्या मालकाचे नाव आणि तिच्या कौमार्याची माहिती देतात. इसिसच्या दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी १२ वर्षांची मुलगी विक्री करणे असल्याची जाहिरात टेलिग्राम अ‍ॅपवर दिली होती. कुमारिका, सुंदर, वय १२ वर्षेआणि आॅनलाईन बाजारातील तिची किंमत साडेबारा हजार डॉलरपर्यंत गेली असून तिची लवकरच विक्री होईल, असा घृणास्पद मजकूर या जाहिरातीत होता. याशिवाय मुलीचे छायाचित्रही टाकण्यात आले होते. या भागात टेलिग्राम लोकप्रिय असून दहशतवादी टेलिग्रामवर मुलींची राजरोसपणे विक्री करीत आहेत. दहशतवादी व्हॉटस् अ‍ॅप आणि टेलिग्रामद्वारे सात महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंतच्या मुलीचीही ३७०० डॉलरला विक्री करीत आहेत. इसिसच्या दहशतवाद्यांनी ३००० हून अधिक मुलींना लैंगिक दासी बनविले असल्याचे वृत्त विविध दैनिकांनी दिले आहे. या मुलींपैकी बहुतांश मुली अल्पसंख्याक याझिदी समाजाच्या आहेत. इसिसच्या ताब्यातील महिला, मुलींची सुटका करणे अत्यंत कठीण आहे. शिवाय त्यांना तेथून पळ काढणेही शक्य नाही. कारण, त्यांच्या नावाची त्यांच्या मालकाच्या नावे नोंद असते आणि इसिसच्या प्रत्येक तपासणी नाक्याकडे याची यादी आहे. (वृत्तसंस्था)ओलीस महिलांची संख्या किती हे स्पष्ट नाहीइसिसने २०१४ मध्ये इराकवर हल्ला करून याझिदी समाजाला लक्ष्य करीत या समाजातील हजारो मुली आणि महिलांना ओलिस ठेवले होते. युद्धापूर्वी या समाजाची इराकमधील संख्या पाच लाख होती; मात्र आता त्यांची संख्या किती आहे हे सांगता येत नाही.