शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचा दबाव झुगारून उत्तर कोरियाची पुन्‍हा बॅलेस्टिक क्षेपणास्‍त्र चाचणी

By admin | Updated: May 14, 2017 16:24 IST

उत्तर कोरियावर क्षेपणास्त्र चाचणी न घेण्याचा दबाव वाढत असतानाच उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्‍त्र चाचणी केली

ऑनलाइन लोकमतसेऊल, दि. 14 - गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियावर क्षेपणास्त्र चाचणी न घेण्याचा दबाव वाढत असतानाच उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्‍त्र चाचणी केली आहे. आंतरराष्‍ट्रीय दबावाला झुगारून उत्तर कोरियाने पुन्‍हा क्षेपणास्‍त्र चाचणी घेऊन अमेरिकेला एक प्रकारे धक्का दिला आहे. आठवड्याभरापूर्वीच दक्षिण कोरियाच्या राष्‍ट्रपतीपदी विराजमान झालेल्या मून जे इन यांनी उत्तर कोरियाशी चर्चा करून हा मुद्‍दा निकाली काढण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यावर कढी करत उत्तर कोरियानं स्वतःचा आण्विक कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. उत्तर कोरियानं एक बॅलेस्‍टिक क्षेपणास्‍त्राची चाचणी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचं सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बीबीसीच्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने कुसोंग शहरानजीकच्या समुद्रात स्‍थानिक वेळेनुसार 2,000 किलोमीटरच्या उंचीवरून मारा करणा-या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे, पहाटे साडेपाच वाजण्याच्यादरम्यान हे क्षेपणास्‍त्र समुद्रात जवळपास सातशे किमी दूरपर्यंतच्या अंतरावर जाऊन पडले आहे. संयुक्त राष्ट्रानं बॅलेस्‍टिक क्षेपणास्‍त्राच्या परीक्षणावर प्रतिबंध घातले आहेत. तत्पूर्वी उत्तर कोरियानं संयुक्त राष्ट्रांचे नियम पायदळी तुडवून दोन क्षेपणास्‍त्रांची चाचणी घेतली होती. मात्र, ही चाचणी अयशस्‍वी ठरली होती. दरम्‍यान, दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती मून जे इन यांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाच्या चाचणीवर टीकाही केली होती. त्‍यांनी या मुद्‍दयावर चर्चा करण्‍यासाठी सुरक्षा परिषदेची आपात्‍कालीन बैठक बोलावली आहे. या प्रकरणावर चीननंही सावध भूमिका घेतली असून, आता अमेरिकेच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष्य लागलं आहे.