शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या सत्यार्थींना नोबेल

By admin | Updated: October 11, 2014 06:24 IST

या निवडीने भारत-पाकिस्तान आणि हिंदू-मुस्लीम यांना एकाचवेळी हा बहुमान लाभला आहे.

ओस्लो : गेल्या तीन दशकांहून जास्त काळ बालहक्क संरक्षणासाठी भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झटणारे गांधीवादाचे पाईक कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानातील तालिबानी हल्ल्यातून बचावल्यानंतर बालहक्क आणि मुलींच्या शिक्षणाला वाहून घेणारी मलाला युसूफझई यांना शांततेसाठीचा २०१४चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांच्या वाट्याला एकाचवेळी हा सन्मान आला आहे. साठीच्या घरातील सत्यार्थी हे सर्वार्थाने भारतीय असलेले शांततेच्या नोबेलचे पहिले मानकरी, तर १७ वर्षांची मलाला या पुरस्काराची सर्वात लहान मानकरी ठरली आहे. या निवडीने भारत-पाकिस्तान आणि हिंदू-मुस्लीम यांना एकाचवेळी हा बहुमान लाभला आहे. भारतीय उपखंडात या दोघांनी बालहक्क व मुलांचे शिक्षण यासाठी केलेल्या कार्याबद्दल ही निवड झाली. सत्यार्थी यांनी भारतात मुलांची बालमजुरी व तस्करी यातून सुटका करण्यासाठी एनजीओ स्थापन केली व त्यासाठी विद्युत अभियंत्याची नोकरीही सोडून दिली. तर मलाला तालिबानने दोन वर्षांपूर्वी केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून बचावली. मुलींच्या शिक्षणसाठी काम करण्याचा तिचा निर्धार आजही कायम आहे. सत्यार्थी यांच्या एनजीओने ८० हजार मुलांची बालमजुरीतून मुक्तता केली आहे. मुले व युवक यांची अत्याचारातून मुक्तता करण्यास तसेच मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी अखंड परिश्रम करणारे सत्यार्थी व मलाला यांची निवड २०१४च्या शांतता नोबेल पुरस्कारासाठी करण्याचा निर्णय नोबेल समितीने घेतला आहे, असे ज्युरींनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्यार्थी व मलाला यांचे या पुरस्कारासाठी अभिनंदन केले.