शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

विजेत्याने विकले ३० कोटी रूपयांना नोबेल पदक !

By admin | Updated: December 7, 2014 03:58 IST

नोबेल पुरस्कार ३० कोटी रूपयांना विकल्याची घटना घडली असून असे पहिल्यांदाच घडले आहे.

ऑनलाइन लोकमत 
लंडन, दि. ७ - आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा नोबेल पुरस्कार लिलावाच्या माध्यमातून विकत घेता आला तर ... ही घटना केवळ कल्पनाच तसेच अविश्वसनिय वाटावी अशी असली तरी जीवशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार मिळालेल्या जेम्स वॉटसन यांनी ती लिलावातून सत्यात उतरविली आहे. 
नोबेल पुरस्काराच्या मिळणा-या  रक्कमेतून वॉटसन हा पैसा सामाजिक कार्य आणि विज्ञान संशोधनासाठी देणगी म्हणून देणार आहेत. जगात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे की, एखाद्या नोबेल विजेत्याने आपला पुरस्कार लिलावाद्वारे विकून टाकला आहे. अनुवांषिक बांधनीसाठी (डीएनए )संशोधनात महत्वपूर्ण योगदान देणा-या जीवशास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांना १९६२ साली नोबेल पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. त्यांना मिळालेला नोबेल पुरस्कार वॉटसन यांनी लिलावाद्वारे ४.७ मिलियन डॉलरला विकला. दूरध्वनी करून बोली लावणा-या एका अज्ञात इसमाने या पुरस्कारासाठी तब्बल ३० कोटी रूपये मोजले. गुरूवारी  न्यूयॉर्कमधील क्रिस्टीज लिलावामध्ये ही बोली लावण्यात आली. एकेकाळी जेम्स वॉटसन यांचे मित्र असलेले फ्रान्सिस क्रिक यांच्या नोबेल पदकाची बोली २.२ मिलियन डॉलर लावण्यात आली होती. परंतू वॉटसन यांच्या नोबेल पदकाला मोठी रक्कम मिळाली. ७ वर्षापूर्वी वॉटसन यांनी वैज्ञानिक समूदायातून अलग राहण्याचा प्रयत्न केला होता. वॉटसन यांनी त्यावेळी आफ्रिकाबद्दल अपशब्द बोलले होते. आपली सर्वच सामाजिक धोरणे या आधारावर बनली आहेत की, त्यांचा बुध्दीचा स्तर आपल्याइतकाच आहे. परंतू सर्व चाचण्या सांगतात की असे मुळीच होत नाही. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वॉटसन यांनी माफी सुध्दा मागितली होती. वॉटसन यांच्या अन्य दोन हस्तलिखित असलेल्या दस्तावेजचा सुध्दा यावेळी लिलाव करण्यात आला असून यासाठी ६१,००००डॉलर मिळाल्याची माहिती क्रिस्टीज यांनी दिली. दरम्यान, जीवशास्त्रात दिलेल्या योगदानाबद्दल १९६२ साली मेडीसनचा नोबेल पुरस्कार फ्रान्सिस क्रिक, जेम्स वॉटसन आणि मॉरिज विल्किन्स या तीन जणांना संयुक्तपणे देण्यात आला होता.