शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिष्ठेसाठी बहिणीची पतीसह निर्घृण हत्या

By admin | Updated: June 20, 2016 05:05 IST

कुटुंबियांच्या संमतीशिवाय व स्वत:च्या पसंतीच्या तरुणाशी लग्न केल्याबद्दल गरोदर बहीण व तिच्या पतीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

लाहोर : कुटुंबियांच्या संमतीशिवाय व स्वत:च्या पसंतीच्या तरुणाशी लग्न केल्याबद्दल गरोदर बहीण व तिच्या पतीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. मुहम्मद शकील (३०) आणि त्याची पत्नी अक्सा (२६) यांना कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी ठार मारण्यात आले. अक्साचा भाऊ नुकताच सौदी अरेबियाहून परतला होता, असे पोलिसांनी सांगितले. मृत जोडप्याचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते व ते पंजाब प्रांतातील थिकरीवाला खेड्यात राहत होते.

चार दिवसांपूर्वी अक्साचा भाऊ, त्याची आई, मामा व आणखी एक जण जोडप्याच्या घरात धडकले व त्यांना त्यांनी अत्यंत निष्ठुरपणे मारहाण केली. नंतर ते त्या दोघांना अज्ञात ठिकाणी घेऊन गेले व तेथे त्यांना त्यांनी गोळ्या घातल्या, असे ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने वृत्त दिले.

दोघांचेही मृतदेह गुरुवारी रात्री गुजरा-जंग कालव्यातून बाहेर काढण्यात आले. शकील फैसलाबादेतील सरकारी शाळेत, तर अक्सा ग्रामीण आरोग्य केंद्रात कामाला होती. शकीलचे वडील खुशी मुहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीवरून थिकरीवाला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. शवविच्छेदनात त्या दोघांचा मृत्यू बंदुकीच्या गोळ्या डोक्यात मारल्यामुळे झाल्याचे म्हटले. अंगावर जखमाही आढळल्या. अक्सा चार दिवसांनी बाळाला जन्म देणार होती, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी एकाला अटक झाली असून, इतर फरार आहेत. (वृत्तसंस्था)प्रतिष्ठेसाठी १,१०० बळी... दोन दिवसांपूर्वी गुजरनवाला प्रांतात २२ वर्षांच्या गरोदर मुलीला तिच्याच आईने ठार मारले होते. या मुलीने तिच्या कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध स्वत:चे लग्न ठरविले होते. गेल्या आठवड्यात लाहोरमध्ये १८ वर्षांच्या युवतीला जिवंत जाळण्यात आले होते. तिने स्वत:च्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले होते. पाकिस्तानात गेल्या वर्षी कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी किमान १,१०० महिलांना त्यांच्याच नातेवाईकांनी ठार मारले.