शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

नाटो, अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून माघारी

By admin | Updated: December 30, 2014 02:05 IST

अफगाणिस्तानातून अमेरिका आणि नाटोचे सैन्य माघारी आल्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात सर्वात दीर्घकाळ चाललेले १३ वर्षांचे युद्ध संपले आहे.

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानातून अमेरिका आणि नाटोचे सैन्य माघारी आल्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात सर्वात दीर्घकाळ चाललेले १३ वर्षांचे युद्ध संपले आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली लढले गेलेले हे युद्ध संपल्याचे सांगण्यात येत असताना अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांना मात्र बंडखोर तालिबान्यांशी लढावेच लागणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी सैन्य माघारीच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान ही ‘धोकादायक जागा’ असल्याचा इशाराही दिला आहे.अफगाणिस्तानात नाटोने हे युद्ध १३ वर्षे लढले. त्याचा २८ डिसेंबर रोजी औपचारिक शेवट काबूलमध्ये ध्वज अर्ध्यावर घेऊन झाला. यानंतर अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांना स्वबळावर लढावे लागणार आहे. अमेरिकेत ९/११ चा हल्ला झाल्यानंतर अमेरिकेचे सैन्य काबूलमध्ये दाखल झाले ते तालिबान्यांना सत्तेवरून हुसकावून लावण्यासाठी. या युद्धात अमेरिकेचे जवळपास २२०० सैनिक ठार झाले. ओबामा यांनी रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,‘‘गणवेशातील आमच्या पुरुष आणि महिला सैनिकांच्या असाधारण त्यागाबद्दल आभार. आता, अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेली अफगाणिस्तानातील आमची युद्ध मोहीम ‘विश्वासार्ह निष्कर्षाला’येऊन संपत आहे. या १३ वर्षांत अमेरिकेच्या सैन्याने अल कायदाच्या नेतृत्वाला उद्ध्वस्त केले व ओसामा बिन लादेनला न्याय दिला. दहशतवादी कट उधळून लावताना शेकडो अमेरिकनांचे जीव वाचविले.’’ सैन्याचे आणि गुप्तचरांचे आभार मानताना ओबामा म्हणाले,‘‘आम्ही सुरक्षित असून सैनिकांच्या सेवेमुळे आमचा देश अधिक सुरक्षित झाला आहे.’’ अफगाणिस्तानात धाडसी अमेरिकन सैनिक आणि मुत्सद्यांमुळे, तसेच नाटोचे मित्र आणि आघाडीतील भागीदार देश यांच्यामुळे अफगाणिस्तानच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. आता ते स्वत:च्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतील. त्यांनी ऐतिहासिक ठरलेली निवडणूक घेऊन ती पूर्ण केली. सत्तेचे पहिले लोकशाही मार्गांनी हस्तांतरण पूर्ण केले.’’अफगाणिस्तान सरकारच्या निमंत्रणावरून अमेरिका आणि आमचे मित्र देश व भागीदार मर्यादित स्वरूपात तेथे राहणार आहोत. अफगाणिस्तान सैन्याला प्रशिक्षण, सल्ला आम्ही देणार आहोत, असेही ओबामा म्हणाले. अफगाणिस्तानशी झालेल्या द्विपक्षीय करारानुसार १२,५०० विदेशी सैन्य अफगाणिस्तानात राहील. हे थेट लढणार नाही; परंतु तालिबानविरुद्ध अफगाणिस्तानचे सैन्य व पोलिसांना मदत करील. अफगाणिस्तानात तालिबान्यांचे १९९६ पासून २००१ पर्यंत राज्य होते. (वृत्तसंस्था)४काबूल : अफगाणिस्तानात नाटो आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्य मोहीम अपयशी ठरली असून, या मोहिमेतील क्रूरतेमुळे देशाला रक्तपात बघावा लागला, असे तालिबानने म्हटले.४अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेत असल्याची औपचारिक घोषणा रविवारी काबूलमध्ये गोपनीय कार्यक्रमात करण्यात आली. त्यानंतर सोमवारी तालिबानने इंग्रजी भाषेत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सैन्य मोहीम अपयशी ठरल्याचे म्हटले. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार अफगाणिस्तानात १० हजार लोक ठार झाले. यातील ७५ टक्के लोक हे तालिबानच्या हल्ल्यांत मरण पावले.