शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नासाचे ‘मॅसेंजर’ बुध ग्रहावर आदळले

By admin | Updated: May 1, 2015 22:56 IST

नासाचे ‘मॅसेंजर’ हे अंतराळ यान बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर अपघातग्रस्त झाल्याने ११ वर्षांपासून सुरू असलेली ऐतिहासिक अंतराळ मोहीम संपुष्टात आली आहे

वॉशिंग्टन: नासाचे ‘मॅसेंजर’ हे अंतराळ यान बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर अपघातग्रस्त झाल्याने ११ वर्षांपासून सुरू असलेली ऐतिहासिक अंतराळ मोहीम संपुष्टात आली आहे. या मोहिमेत ग्रहाबद्दल महत्त्वाची आकडेवारी आणि हजारो छायाचित्रे प्राप्त झाली होती.मेरीलँड येथील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी अप्लाईड फिजिक्स लेबॉरेटरीच्या नियंत्रणकर्त्यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. मॅसेंजर (मरक्युरी सरफेस, स्पेस एनव्हायर्नमेंट,जिओकेमिस्ट्री अ‍ॅण्ड रेंजिंग) नावाचे अंतराळ यान गुरुवारी बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर धडकले.३ आॅगस्ट २००४ रोजी मॅसेंजरचे प्रक्षेपण करण्यात आले होते आणि या अंतराळ यानाने १८ मार्च २०११ रोजी बुध ग्रहाच्या कक्षेत फिरणे सुरू केले. मॅसेंजरने मार्च २०१२ पर्यत आपले प्राथमिक लक्ष्य साध्य केले होते. मॅसेंजरच्या प्रारंभिक मोहिमेत काही नवे आणि महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे या मोहिमेचा नव्याने विस्तार करण्यात आला होता. फार कमी उंचीवरून अवलोकन करणे, छायाचित्रे काढणे आणि ग्रहाबद्दल अभूतपूर्व माहिती गोळा करण्याची अत्यंत महत्त्वाची कामगिरी मॅसेंजरने यश्स्वीरीत्या पूर्ण केली होती. गेल्या महिन्यात या मोहिमेचा एक अंतिम आणि आपत्कालीन विस्तार करण्यात आला होता. या काळात अंतराळयानाने ग्रहाच्या अगदी जवळून पृष्ठभागापासून केवळ ५ ते ३५ किमी उंचीवर काम केले. २८ एप्रिलला या पथकाने अंतिम संशोधनही पूर्ण केले होते. यासाठी मॅसेंजरला अतिरिक्त एक महिना हवेत राहावे लागले होते. (वृत्तसंस्था)