शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
5
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
6
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
7
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
8
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
9
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
11
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
12
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
13
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
15
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
16
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
17
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
18
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
19
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
20
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
Daily Top 2Weekly Top 5

'प्ले बॉय'मॅगझिनमध्ये प्रथमच झळकणार हिजाब घातलेली मुस्लिम तरुणी

By admin | Updated: September 28, 2016 16:11 IST

प्ले बॉय या प्रसिद्ध मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच हिजाब परिधान केलेली पहिली मुस्लिम तरुणी दिसणार आहे. अमेरिकन पत्रकार नूर टगौरीचा हा फोटो असून ऑक्टोबरमध्ये या मॅगझिनचा अंक प्रसिद्ध होणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

लॉस एंजलिस, दि. २८ - नग्नता आणि उत्तान मादकतेला छायाचित्रणाच्या माध्यमातून जगभरात लोकप्रियता मिळवून देणा-या
'प्ले बॉय' या प्रसिद्ध मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच 'हिजाब' परिधान केलेली मुस्लिम तरूणी दिसणार आहे. 
 
नूर टॅगौरी, असे तिचे नाव असून ती ' न्यूझी' ( Newsy) या व्हिडीओ न्यूज नेटवर्कसाठी पत्रकार म्हणून काम करते. येत्या ऑ़क्टोबरमध्ये प्रसिद्ध होणा-या अंकात नूरचे फोटो झळकणार आहेत. मॅगझिनमध्ये नूर काळे लेदर जॅकेट, जिन्स, स्निकर्स आणि हिजाब अशा वेशात दिसत आहे.  तिच्या या धाडसी भूमिकेचे कौतुक होत असले तरी काहींनी तिची ही कृती योग्य नसल्याचे सांगत तिच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 
 
' ज्या पुरुष व महिलांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी आयुष्य झोकून दिले अशा काही निवडक व्यक्तींचा' प्ले-बॉय मॅगझिनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
एखाद्याचे व्यक्तीस्वातंत्र्य त्याच्या वेशाच्या पलीकडे येऊ नये असे विचार असणा-या 22 वर्षीय नूरने ' अमेरिकन टेलिव्हिजन'वर पहिली ' हिजाब' (परिधान केलेली) अँकर बनण्याचे स्वप्न पाहिले आहे. 
 
2012 मध्ये सोशल मीडियावरील #LetNoorShine कॅम्पेनमुळे नूर प्रसिद्धी झोतात आली. सोशल मीडियावर तिचे एक लाखांपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत.