शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

आईनेच दिले मुलीला गर्भाशय

By admin | Updated: November 27, 2015 00:25 IST

जन्मदाती आई मुलांसाठी काय नाही करत? आईचे हे दातृत्व जगाच्या पाठीवर सर्वत्रच दिसून येते. चीनमधील या महिलेने आपल्या मुलीसाठी गर्भाशय देत आईच्या दातृत्वाला नवे परिमाण दिले आहे.

बीजिंग : जन्मदाती आई मुलांसाठी काय नाही करत? आईचे हे दातृत्व जगाच्या पाठीवर सर्वत्रच दिसून येते. चीनमधील या महिलेने आपल्या मुलीसाठी गर्भाशय देत आईच्या दातृत्वाला नवे परिमाण दिले आहे. शियानच्या शिजिंंग हॉस्पिटलमध्ये रोबोटच्या मदतीने ही अवघड शस्त्रक्रिया पार पडली. प्रसूती व स्त्रीरोग विभागाचे संचालक चेन बिलियांग यांनी सांगितले की, या शस्त्रक्रियेत ३८ चिकित्सक सहभागी झाले होते. या हॉस्पिटलचे उपाध्यक्ष ली शियाओकांग यांनी सांगितले की, चीनमधील हे पहिले गर्भाशय प्रत्यारोपण आहे. गर्भाशय दान करणारी महिला आणि तिची २२ वर्षीय मुलगी यांची प्रकृती स्थिर आहे. गर्भाशय प्रत्यारोपणाबाबत अनेक वर्षांपासून संशोधन आणि प्रयोग सुरू आहेत. अमेरिकेत १९६० च्या दशकात प्राण्यांवर प्रथम प्रयोग करण्यात आले. जगात सर्वात प्रथम सौदी अरेबियात २००० मध्ये मानवी गर्भाशयाचे प्रत्यारोपण झाले होते. दरम्यान, चीनमधील या प्रत्यारोपणानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.(वृत्तसंस्था)काही तज्ञांच्या मते या प्रत्यारोपणात मोठ्या प्रमाणात धोकेही आहेत, तर काही तज्ञ म्हणतात की, या प्रत्यारोपणामुळे त्या महिलांना पर्याय मिळाला आहे ज्या काही कारणास्तव मुलांना जन्म देऊ शकत नाहीत.