शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

मोदींचा अमेरिका दौरा द्विपक्षीय संबंधांचा उत्सव

By admin | Updated: June 3, 2016 03:02 IST

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. हा दौरा म्हणजे दोन देशांतील मजबूत होत असलेल्या संबंधांचा उत्सव आहे

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. हा दौरा म्हणजे दोन देशांतील मजबूत होत असलेल्या संबंधांचा उत्सव आहे, असे मत भारताचे अमेरिकेतील राजदूत अरुण के. सिंह यांनी व्यक्त केले आहे. येथे पत्रकारांशी बोलताना अरुण सिंह म्हणाले की, अमेरिकेचे हे निमंत्रण म्हणजे दोन्ही देशांतील मजबूत संबंधाचा उत्सव आहे. पंतप्रधान मोदी हे ६ जून रोजी एण्ड्र्यूज स्थित ज्वाइंट एयरफोर्स बेसवर पोहोचतील, तर अमेरिकेच्या राजधानीत ते ५० तासांपेक्षा अधिक वेळ थांंबू शकतील. दरम्यान, मोदी यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमाला अद्याप अंतिम स्वरूप देणे बाकी आहे. मोदी हे अध्यक्षांच्या अतिथिगृहात ब्लेयर हाउसमध्ये थांबण्याची शक्यता आहे. व्हाइट हाउसमध्ये या दोन नेत्यांत ७ जून रोजी चर्चा होण्याची शक्यता आहे. मोदी हे अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोससहित अमेरिकेतील कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांशी चर्चा करतील, तर भारतात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. ८ जून रोजी मोदी अमेरिकी काँग्रेसला संबोधित करणार आहेत. अरुण सिंह यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आपल्या स्थायी सदस्यत्वासाठी अमेरिकेने समर्थन दिले आहे. या दौऱ्यात दोन्ही देश वॉशिंग्टन आणि दिल्लीत महत्त्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने वन्यजीव तस्करी व अन्य करारांचा समावेश आहे. मोदींच्या दौऱ्यापूर्वी वॉशिंग्टन हाउस आणि न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेड यांच्यात कराराबाबत चर्चा सुरू आहे.