शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शरीफ यांचे हात हलवून अभिवादन

By admin | Updated: September 29, 2015 23:10 IST

अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ यांची अनौपचारिक बैठक होईल की केवळ हस्तांदोलन याबाबत अनेक दिवसांपासून सुरू

संयुक्त राष्ट्र : अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ नवाज शरीफ यांची अनौपचारिक बैठक होईल की केवळ हस्तांदोलन याबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कानंतर उभय नेते मंगळवारी समोरासमोर आले; परंतु त्यांची ना भेट झाली ना हस्तांदोलन. केवळ औपचारिकता म्हणून त्यांनी हात हलवून एकमेकांना अभिवादन केले एवढेच. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यजमान असलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या संरक्षण शिखर परिषदेत हे नेते एकत्र आले. मोदी सर्वप्रथम चेंबर हॉलमध्ये आले. त्यानंतर काही मिनिटांनी शरीफ आले. कार्यक्रम सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी शरीफ यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाहून हात हलवला. ते पाहून मोदींनी स्मित करीत हात हलवून त्यांना प्रतिसाद दिला. थोड्या अवकाशानंतर मोदींनी शरीफ यांच्याकडे पाहून पुन्हा हात हलविला. त्यावर शरीफ यांनी स्मित करीत शिर हलवून त्यांना प्रतिसाद दिला. हे वगळता उभय नेत्यांत कोणताही संवाद झाला नाही. दोन्हीही नेते परिषद सुरू होण्याच्या काही मिनिटेच आधी सभागृहात पोहोचले होते. त्यांनी आपापले स्थान ग्रहण केले व त्यानंतर ते जागेवरून उठले नाही. सभागृहामध्ये उपस्थित इतर नेत्यांनाही भेटण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. दोघांनीही एकमेकांच्या भाषणानंतर टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. शरीफ यांच्या बाजूकडे ओबामा, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, रवांडा व इथियोपियाचे नेते बसले होते, तर मोदींच्या बाजूकडे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून, जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे, तसेच फ्रान्स व इंडोनेसियाचे नेते बसलेले होते. मोदी आणि शरीफ सुमारे दीड तास सभागृहात होते. परिषदेला संबोधित केल्यानंतर मोदी लगेचच सभागृहातून बाहेर पडले. ते हस्तांदोलन करण्यासाठी एकाही नेत्याकडे गेले नाहीत. मोदी यांच्यानंतर १० ते १५ मिनिटांनी शरीफ यांनी सभागृह सोडले. -----------ओबामा चुकून म्हणाले, राष्ट्रपती मोदीन्यूयॉर्क : अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर संयुक्त निवेदन देताना मोदींचा चुकून ‘राष्ट्रपती मोदी’ असा उल्लेख केला. ओबामांचा हा व्हिडिओ व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आला आहे.----------काश्मीर भारत-पाकचा द्विपक्षीय मुद्दा- ओबामादहशतवादाविरुद्ध लढण्याची वेळन्यूयॉर्क : दहशतवादी ही जागतिक समस्या असून यातून कोणताही देश सुटू शकत नाही. या धोक्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजूट होऊन लढण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांना सांगितले. ओबामांसोबतच्या बैठकीत मोदी यांनी हे मत व्यक्त केले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना काश्मीर हा भारत-पाकिस्तानचा मुद्दा असून त्यांनी स्वत:च त्यावर तोडगा काढल्यास सर्वांनाच आनंद होईल असे ओबामांनी म्हटल्याचे सांगितले. न्यूयॉर्क : काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असून तो भारत आणि पाकिस्ताननेच सोडवायचा असल्याचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या चर्चेत मान्य केले. -----------संयुक्त राष्ट्र : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सीरियाच्या संकटावर चर्चा केली. तथापि, सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्या भूमिकेबाबत मात्र या नेत्यांमध्ये सहमती दिसून आली नाही.ओबामा यांनी तत्पूर्वी सीरियातील नेते हे मुलांची हत्या करणारे हुकूमशाह असल्याची टीका केली. मात्र, पुतीन यांनी असद यांचे समर्थन केले पाहिजे अशी भूमिका मांडली. या देशात कारवाईदरम्यान प्रसंगी हवाई हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही पुतीन म्हणाले. -----------मोदी मायदेशी रवानान्यूयॉर्क : आयर्लंड व अमेरिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मायदेशी रवाना झाले. माझ्या अमेरिका दौऱ्याने आमच्या संबंधांची विलक्षण विविधता व सखोलता दर्शविली. या काही दिवसांत खूप काम होऊ शकले, असे टष्ट्वीट मोदींनी मायदेशी रवाना होण्यापूर्वी केले.