शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोसॉफ्ट, गुगल इंडियाचा मदतीचा हात

By admin | Updated: September 28, 2015 02:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी माहिती-तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध सिलिकॉन व्हॅलीला भेट देत आयटी दिग्गजांशी (टेक टायटनशी) संवाद साधल्याची पाच फलश्रुती पाच महत्त्वपूर्ण घोषणांमध्ये झाली आहे

सान जोस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी माहिती-तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध सिलिकॉन व्हॅलीला भेट देत आयटी दिग्गजांशी (टेक टायटनशी) संवाद साधल्याची पाच फलश्रुती पाच महत्त्वपूर्ण घोषणांमध्ये झाली आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्य नडेला यांनी भारतातील पाच लाख गावांना ब्रॉडबॅन्ड कनेक्टिव्हिटी तर गुगलने ५०० रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सुविधा देण्यासाठी केंद्र स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे.सान जोस येथे बोलताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी कमी किमतीतील ब्रॉडबॅन्ड तंत्रज्ञान भारतातील पाच लाख गावांपर्यंत पोहोचविण्याची मनीषा व्यक्त करीत ‘डिजिटल इंडिया’त सहभागासाठी उत्सुक असल्याचे स्पष्ट केले. कमी खर्चाचा ब्रॉडबॅन्ड संपर्क आणि क्लाऊड कम्प्युटिंगच्या साह्याने कामकाजात सृजनात्मकता, दक्षता आणि उत्पादकता वाढविण्यात मोलाचे योगदान देता येईल. त्यामुळे संपूर्ण भारतात योग्य दरात उत्पादन आणि सेवा सुनिश्चित करता येतील. आमची कंपनी भारतातील डाटा सेंटरच्या माध्यमातून क्लाऊड सेवा उपलब्ध करण्याची घोषणा करणार असून ती मोठी उपलब्धी ठरेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.भारतात उत्पादन केंद्र स्थापन करण्याचे निमंत्रण दिले असता अ‍ॅप्पलचे सीईओ टीम कूक यांनी मोदींना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अ‍ॅप्पलच्या फॉक्सकॉन या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने भारतात प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रकारांना सांगितले. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी डिजिटल साक्षरतेला गती देताना पुढील महिन्यापासून भारतात गुजरातीसह १० वेगवेगळ्या भाषांमधून टाईप करण्याची सुविधा उपलब्ध करवून देणार असल्याचे स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)