शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सागरी संरक्षण, दहशतवाद विरोधात एकत्र काम करावे

By admin | Updated: March 13, 2015 23:30 IST

भारत आणि श्रीलंकेची सुरक्षितता ही अविभाज्य असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी संरक्षण व दहशतवादविरोधी कारवाईच्या

कोलंबो : भारत आणि श्रीलंकेची सुरक्षितता ही अविभाज्य असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी संरक्षण व दहशतवादविरोधी कारवाईच्या क्षेत्रांत सहकार्य वाढले पाहिजे, असे आवाहन केले. मोदी यांनी शुक्रवारी श्रीलंकेच्या संसदेत बोलताना श्रीलंकेची अखंडता आणि ऐक्यासाठी भारताकडून सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. श्रीलंकेच्या संसदेत भाषण करणारे मोदी हे चौथे पंतप्रधान असून यापूर्वी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व मोरारजी देसाई यांनी भाषण केले होते. भारत आणि श्रीलंकेच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी भारतीय महासागराचे खूप महत्त्व आहे. हे दोन्ही देश एकत्र येऊन काम करणार असतील तर ही उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य होतील; मात्र त्यासाठी परस्परांत विश्वासाचे वातावरण आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.श्रीलंकेच्या नागरिकांना सिंहला व तमिळ नूतन वर्षापासून (१४ एप्रिल २०१५) टुरिस्ट व्हिसा आॅन अरायव्हल दिला जाईल व दिल्ली आणि कोलंबोदरम्यान एअर इंडियाद्वारे थेट विमानसेवा लवकरच सुरू केली जाईल, अशी घोषणा मोदी यांनी केली. रामायणातील अवशेष विकसित करण्यासाठी भारत श्रीलंकेला सहकार्य करील व भारतात बुद्धिस्ट सर्किट तयार करायला सहकार्य करील, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)