शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

मक्केत क्रेन दुर्घटना, दोन भारतीयांसह १०७ जण ठार

By admin | Updated: September 12, 2015 09:38 IST

सौदी अरेबियातील पवित्र मक्का येथे शुक्रवारी झालेल्या क्रेन दुर्घटनेत १०७ जण ठार, तर २३८ जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये ९ भारतीय यात्रेकरुंचा समावेश आहे

ऑनलाइन लोकमत

रियाध : सौदी अरेबियातील पवित्र मक्का येथे शुक्रवारी झालेल्या क्रेन दुर्घटनेत १०७ जण ठार, तर २३८ जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये ९ भारतीय यात्रेकरुंचा समावेश आहे. अल अरेबिया टेलिव्हिजनने याबाबतचे वृत्त प्रथम दिले. सौदीच्या नागरी सुरक्षा प्राधिकरणानेही या वृत्ताला दुजोरा दिला असून दुर्घटनेबाबत ट्विट केले आहे. दरम्यान, मृतांमध्ये दोन भारतीयांचा समावेश असल्याचे परराष्ट्र खात्याने सांगितले आहे. जखमींमध्येही १५ भारतीय असून त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यात येत असल्याचे तसेच सर्वतोपरी सहाय्य करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे.

मक्का येथील ग्रॅंड मशिदीत क्रेन उलटून ही मोठी दुर्घटना घडली. यावेळी शुक्रवार असल्याने मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जास्त भाविक उपस्थित होते. जगभरातून येथे हज यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता या परिसरात विकासाची योजना हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार चार लाख चौरस मीटरवर २२ लाख भाविक एकाच वेळी थांबू शकतील असे नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी क्रेनने कामे सुरू असताना ही दुर्घटना घडली. यावेळी पाऊसही कोसळत होता. जोरदार वाऱ्यामुळे क्रेन कोसळल्याचे सांगितले जात आहे. तसेच, क्रेन कोसळल्याने मशिद परिसरात मातीचे ढिगारे पडल्याने त्याखाली अनेक जण अडकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या क्रेनचे काम कोणती कंपनी करत होती, नक्की अपघात कशामुळे घडला आदी कारणांचा शोध घेण्यात येत आहे. मक्केमध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात येणा-या बांधकामांना विरोध करणा-या काहीजणांनी प्रचंड प्रमाणावर क्रेन्सची कामं सुरू असताना अत्यंत गलथानपणाचा आरोप केला आहे. तसेच, या पवित्र वास्तुंची हेळसांड केल्याचा आरोपही केला आहे. मक्केतील इस्लामिक हेरीटेज रीसर्च फाउंडेशनचे सहसंस्थापक इरफान अल अलावी यांनी या हेरीटेज वास्तू प्रेषित मोहम्मद यांच्याशी दुवा सांधतात, पण याची कामं करणा-यांना पर्वा नसते असे सांगितले. त्याचप्रमाणे आरोग्य व सुरक्षा यांचाही विचार होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.