शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशांची यादी तयार !

By admin | Updated: June 23, 2014 03:26 IST

काळा पैसा शोधून काढण्याच्या भारताच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत स्वित्झर्लंड सरकारने स्विस बँकेत काळा पैसा ठेवणाऱ्या भारतीयांची यादी तयार केली असून, त्याचे तपशील भारत सरकारला दिले जात आहेत

झुरीक : काळा पैसा शोधून काढण्याच्या भारताच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत स्वित्झर्लंड सरकारने स्विस बँकेत काळा पैसा ठेवणाऱ्या भारतीयांची यादी तयार केली असून, त्याचे तपशील भारत सरकारला दिले जात आहेत. स्वित्झर्लंडमधील विविध बँकांत ठेवलेल्या पैशाचा नक्की लाभ कोणाला होतो, याचा शोध घेत असताना या भारतीयांची नावे समोर आली आहेत, असे स्विस सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या लोकांचा पैसा कर न भरता ठेवलेला असावा असा अंदाज आहे. कर न भरता किंवा कायदेशीर बाबी पूर्ण न करता हा पैसा ट्रस्ट, डोमिसिलरी कंपन्या, इतर मार्गाने हा पैसा दुसऱ्या बिगरभारतीय देशातून स्विस बँकांत वळविण्यात आला आहे. हा पैसा नावावर असलेल्या व्यक्ती वा संस्था यांची नावे देण्यास या अधिकाऱ्याने नकार दिला. भारत व स्वित्झर्लंड यांच्यात गुप्ततेचा करार असल्याचे कारण त्याने दिले आहे.या अधिकाऱ्याला माध्यमांशी बोलण्याची परवानगी नाही, त्यामुळे त्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ही यादी स्विस सरकारने स्वत: होऊन तयार केली आहे. त्यामुळे याआधी भारतीय अधिकाऱ्यांनी मागितलेली माहिती, बाहेर पसरलेली माहिती, काही बँकांची चोरून मिळविलेली यादी असे या माहितीचे स्वरूप नाही. ही कथित एचएसबीसीची यादी नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे. भारतातील नव्या सरकारबरोबर काम करण्याची आमची तयारी आहे, तसेच नुकत्याच स्थापन झालेल्या एसआयटी (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम)लाही सहकार्य करू, असे त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)