शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गुंडांना 5 लाख देऊन बेवफा नव-याची केली धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 16:17 IST

एका महिलेने विश्वासघात करणा-या आपल्या नव-याला भाड्याच्या गुंडांकडून बेदम चोप देऊन त्याला चांगली अद्दल घडवली आहे.

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 14 -  एका महिलेने विश्वासघात करणा-या आपल्या पतीला भाड्याच्या गुंडांकडून बेदम चोप देऊन त्याला चांगली अद्दल घडवली आहे. पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील ही घटना आहे. आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय या महिलेला होता. यामुळे तिने पतीला अद्दल घडवण्यासाठी हा सर्व घटाटोप केला. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने तब्बल 5 लाख रुपये मोजून गुंडांना आपल्या पतीची धुलाई करायला सांगितले. 
 
'एक्स्प्रेस ट्रिब्युन'ने दिलेल्या बातमीनुसार, याप्रकरणी पोलिसांनी लुबना कमर रजा या महिलेला अटक केली आहे. 'आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध असून ते आपला विश्वासघात करत आहे असा संशय लुबनाला होता. कारण तिचे पती घरी उशीरा रात्री येत असत. यावर त्या दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. ही गोष्ट तिने आपल्या मैत्रिणीला सांगितली. यावेळी तिच्या मैत्रिणीने नव-याला अद्दल घडवण्याची कल्पना सुचवली. व 'माझा नवरा तुझ्या नव-याला अद्दल घडवण्यासाठी गुंडांची व्यवस्था करू शकतो', असेही सांगितले.
लुबनाने पतीला अद्दल घडवण्यासाठी गुंडांना तब्बल 5 लाख रुपये दिले. यानंतर गुंडांनी घरात घुसून लुबनाच्या पतीला बेदम चोप दिला. घरात शिरताना काही अडचण येऊ नये म्हणून लुबनानेच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची चावीही गुंडांना आधीच दिली होती. सुरुवातीला चौकशीदरम्यान पोलिसांना चोरीच्या उद्देशाने ही घटना घडली असावी, असे वाटले. मात्र चौकशीअंती या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. यात पीडित पतीच्या पत्नीचा म्हणजे लुबनाचाच हात असल्याचे सत्य समोर आले.