शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकणाऱ्या शेवटच्या सदस्याचे निधन

By admin | Updated: July 31, 2014 03:39 IST

जपानमधील हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकणाऱ्या पथकातील अखेरच्या जिवंत सदस्याचे जॉर्जियात निधन झाले. या हल्ल्याने दुसरे महायुद्ध त्वरेने संपुष्टात आणण्यासह जगाला अणुयुगात ढकलले होते.

अटलांटा : जपानमधील हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकणाऱ्या पथकातील अखेरच्या जिवंत सदस्याचे जॉर्जियात निधन झाले. या हल्ल्याने दुसरे महायुद्ध त्वरेने संपुष्टात आणण्यासह जगाला अणुयुगात ढकलले होते. थियोदोर व्हॅन किर्क यांचे वृद्धापकाळाने ‘स्टोन माउंटन’ येथे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. व्हॅन किर्क यांनी बॉम्बहल्ल्याच्या तब्बल ६० मोहिमांत सहभाग घेतला. मात्र, प्रशांत पट्ट्यातील एका मोहिमेने त्यांच्या नावाची इतिहासात नोंद केली. ही मोहीम होती जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकण्याची. तेव्हा २४ वर्षांचे असलेले किर्क बी-२९ सुपर फोर्ट रेसमध्ये कार्यरत होते. याच तुकडीने हिरोशिमावर सहा आॅगस्ट १९४५ रोजी पहिला अणुबॉम्ब टाकला होता.किर्क यांनी पॉल तिब्बेटस अणि टॉम फेरेबी यांच्या सोबत हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला होता. २००५ मध्ये एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत किर्क यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडल्याचे सांगितले. ते म्हणाले, किर्क यांनी बॉम्बहल्ला करणाऱ्या विमानास हिरोशिमाकडे जाण्याचा मार्ग दाखविण्याचे काम केले. अणुबॉम्ब टाकल्यानंतर आपण वाचू शकू, अशी विमानातील सर्वांना आशा तसेच धाकधूकही होती. या बॉम्बचा स्फोट होईल का, किंवा झाल्यास त्याच्या तडाख्याने विमानाचे तुकडे तुकडे होतील काय याची कोणालाच कल्पना नव्हती. या पथकाने निद्राधीन हिरोशिमा शहरावर ९ हजार पौंड वजनाचा ‘लिटल बॉय’ हा अणुबॉम्ब टाकला आणि गणती सुरू केली. एक हजार एक, एक हजार दोन असे करत त्यांनी ४३ सेकंद गणती केली. ४३ सेकंदात अणुबॉम्बचा स्फोट होईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र, ४३ सेकंदानंतरही स्फोट झाला नाही. त्यामुळे किर्क यांच्यासह विमानातील सर्वांना हा बॉम्ब फुसका असल्याचे वाटू लागले होते. त्यानंतर काही क्षणात अत्यंत चमकदार प्रकाश पसरला आणि त्यानंतर धक्का जाणवला. त्यानंतर पुन्हा एक धक्का बसला. हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या स्फोटाने एक लाख ४० हजार नागरिकांचा बळी घेतला होता. हिरोशिमावरील हल्ल्यानंतर तीन दिवसांनी नागासाकी शहरात दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला. यात ८० हजार नागरिक मारले गेले. अपरिमित जीवित हानीनंतर अखेर जपानने शरणागती पत्करली होती. (वृत्तसंस्था)