शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

केनियात विद्यापीठावर हल्ला, ७० ठार

By admin | Updated: April 2, 2015 23:51 IST

केनियातील विद्यापीठावर बंदूकधाऱ्यांनी गुरुवारी केलेल्या हल्ल्यामध्ये ७० ठार, तर ७९ जण जखमी झाले. हल्लेखोरांचे चेहरे झाकलेले होते

नैरोबी : केनियातील विद्यापीठावर बंदूकधाऱ्यांनी गुरुवारी केलेल्या हल्ल्यामध्ये ७० ठार, तर ७९ जण जखमी झाले. हल्लेखोरांचे चेहरे झाकलेले होते. त्यांनी वसतिगृहाला लक्ष्य करीत अंदाधुंद गोळीबार केला. हल्ल्याची एकूण पद्धत पाहता सोमालियन दहशतवादी संघटनेचे कृत्य वाटते, असे सूत्रांनी सांगितले. गॅरीस्सा युनिव्हर्सिटी कॉलेजवर पहाटे हा हल्ला झाला. बहुतांश लोक तेव्हा झोपेत होते. गोळीबाराच्या आवाजाने विद्यापीठ परिसरात प्रचंड दहशत पसरली, असे या हल्ल्यातून बचावलेला विद्यार्थी आॅगुस्टीन अलान्गा (२१) याने एका वृत्तसंस्थेला सांगितले. हा गोळीबार लगेच तीव्र झाला, असे तो म्हणाला. प्रचंड गोळीबारामुळे अनेक विद्यार्थ्यांना आहे तेथेच कोंडून घेणे भाग पडले तर काही जणांनी पळ काढला. बंदूकधारी पळणाऱ्यांवर पाठीमागून गोळीबार करीत होते. मी किमान पाच सशस्त्र, चेहरा झाकलेले बंदूकधारी पाहिले. मी अनवाणी पळालो. पळताना पडून मला दुखापत झाली, असे तो म्हणाला. हल्ला झाला तेव्हा विद्यापीठ परिसरातील मशिदीत पहाटेची नमाज सुरू होती. तेथील विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला नाही. (वृत्तसंस्था)या हल्ल्यात १५ ठार, तर ६० जण जखमी झाल्याचे गॅरीस्सा शहरातील शवगृह सेवकाने सांगितले. काही गंभीर जखमींना विमानाने नैरोबीला नेण्यात आले, असे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. विद्यापीठातील तीन ते चार वसतिगृहे रिकामी करण्यात आली असून हल्लेखोरांना एका वसतिगृहात घेरण्यात आले आहे, असे राष्ट्रीय आपत्ती मोहीम केंद्राने टिष्ट्वटरवर सांगितले. केनियाच्या सैन्यदलाने विद्यापीठ परिसराला वेढा घातला असून अधिक तपशील मिळू शकला नाही. बंदूकधाऱ्यांनी विद्यापीठ वसतिगृहाच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षकांवर गोळीबार केल्यानंतर जोरदार चकमक उडाली. हल्लेखोर वसतिगृहात घुसण्यात यशस्वी झाल्यामुळे ओलिस नाट्य घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.