शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

मी सक्तीच्या विजनवासात -मल्ल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 03:45 IST

सक्तीच्या विजनवासात असून तूर्त भारतात परतण्याचा आपला कोणताही इरादा नाही, असे संकटग्रस्ट भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांनी म्हटले

लंडन : आपण सक्तीच्या विजनवासात असून तूर्त भारतात परतण्याचा आपला कोणताही इरादा नाही, असे संकटग्रस्ट भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांनी म्हटले आहे. भारतात बँकांचे ९,००० कोटी रुपयांचे कर्ज थकीत ठेवल्याप्रकरणी मल्ल्यांविरुद्ध चौकशी सुरू आहे. केंद्रीय तपास संस्थांनी अलीकडेच त्यांचा पासपोर्ट रद्द केला आहे. लंडनमध्ये वास्तव्याला असलेल्या मल्ल्यांनी ब्रिटनमधील ‘फायनान्शियल टाइम्स’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. मुलाखतीत ते म्हणाले की, किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्जाबाबत आपण कर्जदात्या बँकांशी रास्त समझोता करण्यास तयार आहोत. तथापि, पासपोर्ट रद्द करून अथवा मला अटक करून त्यांना एक पैसाही मिळणार नाही. किंगफिशर ही मल्ल्या यांची कंपनी असून ती दिवाळखोरीत निघाली आहे. मल्ल्या यांनी सांगितले की, मी निश्चितपणे भारतात परतू इच्छितो; परंतु सध्या परिस्थिती माझ्या एकदम विरोधात आहे. सरकारचे पुढचे पाऊल काय असेल हे मला माहीत नाही. मी एक सच्चा देशभक्त असून भारतीय राष्ट्रध्वज उंच ठेवण्यात मला नेहमीच गर्व वाटतो. तथापि, आपल्याविरुद्ध भारतात जोपर्यंत हाकाटी सुरू आहे. तोपर्यंत ब्रिटनमध्येच सुरक्षित रहाण्यात आपणास आनंद वाटत असून, तूर्तास हा देश सोडण्याचा आपला कोणताही विचार नाही. मल्ल्या म्हणाले की, भारतातील आजचे वातावरण समजून घेणे महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया केवळ लोकांचे मत बनविण्यातच महत्त्वपूर्ण भूमिका बजावतोय असे नाही, तर सरकारलाही मोठ्या प्रमाणात चिथावत आहे. भारत सरकारने गुरुवारी ब्रिटन सरकारला पत्र पाठवून मद्यसम्राट मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. (वृत्तसंस्था)हवाला व्यवहारप्रकरणी मल्ल्या यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वारंट काढण्यात आले आहे. फायनान्शियल टाइम्सने सेंट्रल लंडनमधील मेफेअर येथे मल्ल्या यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत चार तास चालली. मल्ल्या २ मार्च रोजी विमानाने दिल्लीहून लंडनला पोहोचले. तत्पूर्वी, सरकारी बँकांच्या एका गटाने मल्ल्यांची बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईनवरील नऊ हजार कोटी रुपयांच्या वसुलीवरून सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. किंगफिशरसाठी घेतलेले कर्ज दुसऱ्या कामासाठी वापरल्याचा किंवा त्याद्वारे इतरत्र संपत्ती खरेदी केल्याचा आरोप मल्ल्या यांनी फेटाळून लावला. सरकार किंगफिशरच्या खात्यांची तपासणी आणि बँकांच्या कर्जाच्या उपयोगाबाबत जगातील सर्वोत्कृष्ट लेखापरीक्षकाची नियुक्ती करू शकते. लेखापरीक्षणातून त्यांना काहीही गैर आढळणार नाही.