शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

लख्वीला डांबून ठेवणे बेकायदा

By admin | Updated: March 13, 2015 23:30 IST

२००८ मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा आॅपरेशन कमांडर जकी-उर-रहमान लख्वी याला तुरुंगात डांबून ठेवणे बेकायदा

इस्लामाबाद : २००८ मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा आॅपरेशन कमांडर जकी-उर-रहमान लख्वी याला तुरुंगात डांबून ठेवणे बेकायदा असल्याचे स्पष्ट करत त्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश येथील हायकोर्टाने शुक्रवारी सरकारला दिले. याआधीच्या सुनावणीवेळी न्यायालयाने या प्रकरणी आपला आदेश राखून ठेवला होता. न्यायाधीश नुरुल हक कुरेशी यांनी कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी लख्वीला तुरुंगात डांबून ठेवण्याचा आदेश ‘बेकायदा’ ठरवत त्याच्या तात्काळ सुटकेचे आदेश दिले.लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सांगितले की, माझ्या अशिलाच्या सुटकेचा आदेश रावळपिंडीच्या अडियाला तुरुंग प्रशासनाला सादर करणार आहे. आम्हाला अद्याप न्यायालयाचा हा आदेश प्राप्त झाला नाही. याप्रकरणी ५ मार्च रोजी झालेल्या सुनावणीवेळी पाक सरकारने लख्वीवरील सर्व आरोपांची सविस्तर यादीच न्यायालयास सादर केली होती. मुंबई हल्ल्यासोबतच एका अफगाण नागरिकाचे अपहरण केल्याचा आरोपही सरकारने केला होता. मात्र, लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी सरकार आपल्या अशिलाविरोधात आणखी एक गुन्हा नोंदविण्याचा कट रचत असल्याचा युक्तिवाद न्यायालयापुढे केला. पाकच्या गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, सरकार लख्वीला अन्य जनसुरक्षा आदेशांतर्गत ताब्यात घेऊ शकते. कारण न्यायालयाने अगोदरच आपल्या पूर्वपरवानगीशिवाय लख्वीविरोधात कोणतेही प्रकरण दाखल करून घेण्यावर बंदी घातली होती. सार्वजनिक सुरक्षा कायम राखण्याच्या आदेशांतर्गत याच आठवड्यात ३० दिवसांच्या अटकेचा आदेशही हायकोर्टाने निलंबित केला आहे. (वृत्तसंस्था)