शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलच्या माजी पंतप्रधानांना ८ महिन्यांची कैद

By admin | Updated: May 26, 2015 01:42 IST

इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जेरुसलेम : इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमेरिकन समर्थक आणि उद्योजक मोरिस टेलेन्स्कीकडून पैशाने भरलेली पाकिटे स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.ओल्मर्ट जेरुसलेम शहराचे महापौर असताना टेलेन्स्कीने त्यांना सहा लाख डॉलर्स दिले आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्री असतानाही अधिक रक्कम ओल्मर्ट यांनी घेतली असा हा आरोप आहे. यावर्षी मार्च महिन्यामध्ये त्यांच्यावरील आरोप निश्चित करण्यात आले. त्यांना आठ महिन्यांचा कारावास आणि २५ हजार डॉलर्स दंड ठोठावण्यात आला. एहूद ओल्मर्ट २००६ ते २००९ या कालावधीत इस्रायलचे पंतप्रधान होते. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना पद गमवावे लागले होते. ६९ वर्षीय ओल्मर्ट १९८८ ते १९९२ या कालावधीत कॅबिनेट मंत्री होते. त्यानंतर २००३ पर्यंत ते जेरुसलेमचे महापौर होते आणि त्यानंतर ते अरायल शेरॉन यांच्या मंत्रिमंडळात होते. शेरॉन आजारी पडल्यानंतर काही काळ अंतरिम पंतप्रधानपद ओल्मर्ट यांनी सांभाळले, नंतर ते पंतप्रधान झाले. त्यांनी पद सोडल्यानंतर बिन्यामिन नेत्यानाहू यांचे युग सुरू झाले.