शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

लंडन हल्ल्यामागे इसिसच

By admin | Updated: March 24, 2017 00:33 IST

ब्रिटनमध्ये बुधवारी दुपारी पार्लमेंट परिसराच्या बाहेरील हल्ला आम्ही घडविला होता, अशी कबुली इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने दिली आहे.

लंडन : ब्रिटनमध्ये बुधवारी दुपारी पार्लमेंट परिसराच्या बाहेरील हल्ला आम्ही घडविला होता, अशी कबुली इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने दिली आहे. या हल्लाप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवादी हल्ल्यात पाच जण मरण पावले असून, संशयित अतिरेक्याला पोलिसांनी कालच ठार केले. तो एकटाच होता, असे तपासात स्पष्ट झाले आहे. अतिरेक्यांच्या कारने चिरडल्याने काही जण मृत्युमुखी पडले आहेत. या अतिरेकी हल्ल्यात एकूण पाच जणांचा मृत्यू आणि ४० जण जखमी झाले आहेत. २९ जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे. अमेरिका, भारतसह सर्व देशांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.पार्लमेंटचे अधिवेशन सुरू असतानाच हा हल्ला झाला होता. त्यामुळे कालची बैठक रद्द करण्यात आली होती. मात्र आज पार्लमेंटचे काम नेहमीप्रमाणे सुरू झाले. जखमी पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी खा. टोबिअल एल्वुड यांनी काल प्रचंड धावपळ केली आणि प्रथमोपचारही केले. मात्र रुग्णवाहिका येण्यास काहीसह विलंब झाल्याने सदर अधिकारी मरण पावला. कीथ पामर (४८) असे त्याचे नाव आहे. हल्लेखोराने मुख्य प्रवेशद्वारातून पार्लमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असता, त्याला कीथ पामर यांनी अडवले. तेव्हा त्याने किथ यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर येथील अधिकाऱ्यांनी या हल्लेखोराला गोळ्या घालून ठार मारले. जखमी झालेल्या दहा ते बारा लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सेंट थॉमस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका महिलेला मृत घोषित केले आहे. ब्रिटनमध्ये एका दशकानंतर झालेला हा सर्वांत मोठा अतिरेकी हल्ला असून, पंतप्रधान थेरेसा मे यांनी या घटनेचा निषेध केला. लोकशाही मूल्यांवरील हा हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोण होता हल्लेखोर?-लंडन आणि बर्मिंगहॅममध्ये सात जणांना अटक करण्यात आली असून, ठार झालेल्या हल्लेखोराची ओळखही पटली आहे. त्याचे नाव खालिद मसूद असे असून, तो ब्रिटिश नागरिक आहे. केंट येथे जन्मलेला ५२ वर्षीय मसूद हा अनेक गुन्ह्यांसाठी पोलिसांना हवा होता. पोलिसांची त्याच्यावर नजर होतीच, पण दहशतवादी कृत्याप्रकरणी त्याच्यावर कोणताही गुन्हा नव्हता.