शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटन हल्ल्यामागे इसिसचा हात

By admin | Updated: March 23, 2017 20:03 IST

ब्रिटनच्या (युनायडेट किंग्डम) संसदेवर बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 23 - ब्रिटनच्या (युनायडेट किंग्डम) संसदेवर बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. 
काल संध्याकाळी ब्रिटन संसदेबाहेरच्या परिसरात हल्लोखोरांनी पादचाऱ्यांना कारने चिरडणे, गोळीबार आणि चाकूने भोकसणे अशाप्रकारे दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये एका हल्लेखोराचा आणि पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आज इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. यावेळी इसिसनने असे म्हटले की, आमच्या संघटनेच्या सैनिकाकडूनच ब्रिटनच्या संसदेवर हल्ला करण्यात आला.
दरम्यान, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर थेरेसा मे यांनी आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच, हल्ला करणारा हल्लेखोर ब्रिटनमध्येच जन्मलेला होता आणि गुप्तचर यंत्रणांनी काही वर्षांपूर्वी त्याची चौकशीही केली होती, अशी माहिती ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दिली.
तसेच, या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा ठिकाणी छापे टाकले असून आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख मार्क रॉवेल यांनीही हल्ल्याबाबत अधिक माहिती दिली.