शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

ईशनिंदा कायद्याच्या पीडितांचा करणार बचाव

By admin | Updated: February 10, 2015 22:46 IST

वादग्रस्त ईशनिंदा कायद्याखाली खटल्यांना सामोरे जात असलेल्या संशयितांपैकी काहींना बळीचा बकरा बनविले गेले असल्याचे पाकिस्तानातील पंजाब

इस्लामाबाद : वादग्रस्त ईशनिंदा कायद्याखाली खटल्यांना सामोरे जात असलेल्या संशयितांपैकी काहींना बळीचा बकरा बनविले गेले असल्याचे पाकिस्तानातील पंजाब सरकारला वाटते. त्यामुळे सरकारने अशा ५० जणांचा न्यायालयात बचाव करण्याचा निर्णय घेतला आहे.पुराव्यांचा अभाव, कमकुवत पुरावे व वकील उपलब्ध नसल्यामुळे दोषी न ठरविल्या गेलेल्या ५० जणांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्या भवितव्याचा लवकर निर्णय घेतला जावा, अशी सरकारची भूमिका आहे.सरकारने २०१० पासून विविध न्यायालयांत सुरू असलेल्या ईशनिंदेच्या २६२ खटल्यांपैकी ५० खटल्यांची लवकर निवाड्यासाठी निवड केली आहे. प्रांताच्या एका उच्चस्तरीय समितीने हे खटले जलदगतीने चालविण्याच्या पद्धतीवर चर्चा करण्यासाठी अलीकडेच बैठक घेतली. सुटकेनंतर छळ होण्यापासून संशयितांचा बचाव करण्यासाठी विविध पंथांच्या विचारसरणीशी संबंधित संघटनांना विश्वासात घेण्यावरही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली होती. मुल्तानमध्ये मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील राशीद रहमान यांच्या हत्येनंतर या समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतरची समितीची ही चौथी बैठक होती. रहमान हे ईशनिंदेच्या आरोपीची बाजू न्यायालयात मांडत होते. माजी लष्करशहा झिया उल हक यांनी त्यांच्या राजवटीचे समर्थन करणाऱ्या धार्मिक गटांना खुश करण्यासाठी ईशनिंदा कायदा लागू केला होता. (वृत्तसंस्था)