शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानाचा आविष्कार - तिघांपासून जन्मले जगातील पहिलं बाळ

By admin | Updated: September 28, 2016 17:44 IST

मॅक्सिकोमध्ये तंत्रज्ञानाच्या अविष्काराने तीन जणांच्या डीएनएचा वापर करुन बाळाला जन्म देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. न्यू सायन्टीस्ट या नियतकालिकाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. 28 -  मूल होत नसलेल्या अनेक दाम्पत्यांनी परस्त्रीच्या सहाय्यानं गुणसूत्रे जुळवून सरोगसी पद्धतीनं बाळाला जन्म देण्याचा आविष्कार आपण पाहिलाय. पण मॅक्सिकोमधील डॉक्टरांनी चमत्कार करून दाखवला आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तीन जणांच्या डीएनएचा वापर करून बाळाला जन्म देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. न्यू सायन्टिस्ट या नियतकालिकाने हे वृत्त प्रकाशित केले आहे. या डीएनएमध्ये आई, वडील आणि एक माता डोनरच्या डीएनएचा वापर करण्यात आला असून, या तंत्रज्ञानामुळे आईच्या गुणसूत्रांमध्ये असलेले दोष बाळामध्ये आले नसून, हे बाळ निरोगी जन्माला आले आहे.

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि असलेल्या तणावाचा परिणाम म्हणून अनेक जोडप्यांना आई-बाबा होण्याचा आनंद मिळविण्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे या क्षेत्रातही गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून, त्यात नवनवीन संशोधनही केले जात आहे.

बाळाचे आई-वडील जॉर्डन येथे राहणारे असून, बाळामध्ये तिसऱ्या व्यक्तीचे जेनेटिक कोड टाकण्याचे काम अमेरिकी शास्त्रज्ञांनी केल्याचे न्यू सायंटिस्टमध्ये म्हटले आहे. बाळाची आई लीघ सिंड्रोम नावाच्या जेनेटिक रोगाने ग्रस्त आहे. यात रोग्याची नर्व्हस सिस्टम प्रभावित होते. मायटोकॉन्ड्रियल डीएनएच्या माध्यामातून हा रोग बाळाच्या शरीरात प्रवेश करतो. या कारणाने सदर महिलेने यापूर्वी एक सहा वर्षांची मुलगी आणि एक आठ वर्षांचा मुलगा गमावला आहे.तीन जणांच्या डीएनएचा वापर करून बाळाला जन्म देता येऊ शकतो. यावर 90च्या दशकाच्या अखेरीस संशोधन सुरू झाले. त्याचा आधार घेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन या बाळाला जन्म देण्यात आला आहे.