शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट स्मार्ट फोनमध्ये चीन भारताच्या पुढे

By admin | Updated: March 20, 2017 01:19 IST

इंटरनेटची उपलब्धता आणि स्मार्ट फोनची मालकी याबाबत चीन भारताच्या कितीतरी पुढे असल्याचे प्यू रिसर्चने जारी केलेल्या

वॉशिंगटन : इंटरनेटची उपलब्धता आणि स्मार्ट फोनची मालकी याबाबत चीन भारताच्या कितीतरी पुढे असल्याचे प्यू रिसर्चने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. प्यू रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ७१ टक्के चिनी उत्तरदात्यांनी आपण इंटरनेट वापरत असल्याचे, तसेच आपल्याकडे स्मार्ट फोन असल्याचे म्हटले आहे. भारतात मात्र, केवळ २१ टक्के उत्तरदात्यांनीच आपण इंटरनेट वापरत असल्याचे, तसेच आपल्याकडे स्मार्ट फोन असल्याचे म्हटले आहे. चीनमधील ६८ टक्के उत्तरदात्यांकडे मोबाइल फोन असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. याउलट भारतात केवळ १८ टक्के उत्तरदात्यांकडेच स्मार्ट फोन असल्याचे दिसून आले. २0१६ च्या वसंतात हे सर्वेक्षण करण्यात आले.२0१३ नंतरच्या काळात चीनमध्ये स्मार्ट फोन असलेल्या नागरिकांची संख्या ३१ टक्क्यांनी वाढली. भारतात हे प्रमाण फक्त ६ टक्के राहिले. सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार चीनमधील ९८ टक्के नागरिकांकडे किमान मोबाइल फोन आहेत. भारतात मात्र, मोबाइल फोन असलेल्यांची संख्या ७२ टक्केच आहे. माध्यमिक शिक्षण घेतलेल्या १0 पैकी सुमारे ४ भारतीयांकडे (३८ टक्के) स्मार्टफोन आहे. त्याखाली शिक्षण असलेल्या भारतीयांत हे प्रमाण फक्त ९ टक्के आहे. उत्पन्नातील तफावतीमुळे ही दरी दिसून आली आहे. ग्रामीण भाग आणि शहरी भाग या पातळीवरही स्मार्ट फोनच्या बाबतीत मोठा फरक दिसून आला. चीनमधील ७२ टक्के शहरी नागरिकांकडे स्मार्ट फोन आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ६३ टक्के आहे. भारतात मात्र, केवळ २९ टक्के शहरी नागरिकांकडे स्मार्ट फोन आहेत. ग्रामीण भागात तर केवळ १३ टक्के नागरिकांकडेच स्मार्ट फोन आहेत. प्यूने म्हटले की, स्मार्ट फोनच्या मालकीबाबत भारतात स्त्री-पुरुषांतही भेद दिसून आला. २३ टक्के भारतीय पुरुषांकडे स्मार्टफोन आहे. मात्र, महिलांच्या बाबतीत हे प्रमाण १४ टक्केच आहे. (वृत्तसंस्था)