शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांशी संवाद

By admin | Updated: April 30, 2015 01:18 IST

गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यापासून संरक्षण करण्यासाठी काही नवे तंत्रज्ञान उपलब्ध होईल का,

तेल अविव (इस्रायल) : गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यापासून संरक्षण करण्यासाठी काही नवे तंत्रज्ञान उपलब्ध होईल का, याचा शोध महाराष्ट्रातील शेतकरी येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात घेत आहेत. असे नुकसान झाल्यावर राज्य सरकारकडून मिळणारी नुकसानभरपाई तुटपुंजी असल्याने आपणच आपला मार्ग शोधलेला बरा, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधून प्रदर्शनाचा हेतू जाणून घेतला.या प्रदर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारासह पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव आणि विदर्भातील शेतकरी आले आहेत. मुख्यत: द्राक्ष बागायतदार, डाळिंब, केळी, संत्री अशी फळपिके घेणारे हे शेतकरी आहेत. गारपीट झाल्यास पिकांचे संरक्षण करणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या जाळ्या (अ‍ॅन्टी हेलनेट, अ‍ॅन्टी डस्ट) येथे उपलब्ध आहेत. जागतिक दर्जाच्या शेती उपयोगी प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या या कंपन्या आहेत. त्याचा दर, त्याची उपयुक्तता, आयुष्यमान यापासून या जाळ्या लावल्यावर पिकांच्या उत्पादकतेवर त्याचा काय परिणाम होईल का, याची माहिती शेतकरी बारकाईने घेताना दिसले. काही कंपन्यांकडे त्यांनी या प्रकारच्या साहित्याची नोंदणीही केली आहे. संरक्षित शेती पद्धतीच्या दिशेने पाऊल टाकल्यास महाराष्ट्रातील शेतकरीही उत्सुक आहे, हेच त्याचे कारण.हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेला शेतकरी हा ‘बडा’ शेतकरी आहे. ज्याची सध्याची शेती किफायतशीर आहे व पुन्हा त्याला शेतीकडून जादा उत्पन्न हवे आहे. असे शेतकरी प्रदर्शनात जास्त दिसले. या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातून येण्यासाठी किमान सव्वा ते दीड लाख रुपये खर्च होतो. ड्रीप इरिगेशन आणि शेड नेटमधील मोठ्या कंपन्या, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या आदींनी शेतकऱ्यांच्या दौऱ्याचे नियोजन केले आहे. या कंपन्यांनी त्यांच्या वितरकांना स्वखर्चाने आणले आहे. पण शेतकऱ्यांना मात्र खर्च द्यावा लागला आहे. प्रख्यात बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर्स, उद्योजक आणि कृषी पदवीधर झालेले तरुण प्रदर्शनासाठी मुद्दाम आले होते.