शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

हंगेरीत स्थलांतरितांना अमानुष वागणूक

By admin | Updated: September 12, 2015 04:47 IST

हंगेरीमध्ये सध्या आलेल्या सीरियन नागरिकांना जनावरांप्रमाणे वागविले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रोस्ज्के येथे असणाऱ्या कॅम्पमध्ये स्थलांतरितांना

बुडापेस्ट : हंगेरीमध्ये सध्या आलेल्या सीरियन नागरिकांना जनावरांप्रमाणे वागविले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रोस्ज्के येथे असणाऱ्या कॅम्पमध्ये स्थलांतरितांना सँडविचची पाकिटे झेलावी लागत आहे. या निर्वासितांच्या कॅम्पमध्ये मिळणाऱ्या वागणुकीबद्दल नव्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अनेक टीकाकारांनी या कॅम्पना कुप्रसिद्ध तुरुंग ग्वांटानामो बे ची उपमा दिली आहे.एका आॅस्ट्रियन स्वयंसेवकाने याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यामुळे हंगेरीवर टीका केली जात आहे. दोनच दिवसांपुर्वी एका महिला व्हिडिओग्राफरने लहान मुलगा व त्याच्या वडिलांना लाथ मारुन पाडले होते. तसेच केलेटी रेल्वेस्थानक आणि सर्बिया-हंगेरी सीमेवर देखिल े बळाचा वापर होत आहे. त्यातच ही घटना घडल्यामुळे हंगेरी सरकारच्या वर्तनावर चर्चा सुरु झाल्या आहेत. आॅस्ट्रियन महिला स्वयंसेवक मायकेला स्प्रीटझेनडॉर्फ यांनी व्हिडिओ चित्रित केला असून त्यांचे पती अलेक्झांडर यांनी तो यूट्यूबवर प्रसारित केला. रशियाची मदत सुरूच...... दरम्यान रशियाने सीरियाला आपली मदत चालूच ठेवली आहे. सीरियाला दारुगोळा, युद्धसामुग्री आणि ग्रेनेड लाँचर्स तसेच ट्रक्सची मदत होत असल्याची माहिती समोर येत आहे. कोमरसांट या रशियन वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जे लावरोव यांनी ही मदत मानवी आधारावर करत असल्याचे स्पष्ट केले आहे.अमेरिका 10,000 निर्वासितांना स्वीकारणार......अमेरिकेने पुढील वर्षापर्यंत आणखी दहा हजार लोकांना स्वीकारण्याचे निश्चित केले आहे. व्हाईट हाऊसचे प्रसिद्धी सचिव जॉन अर्नेस्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार गेले काही महिने अमेरिका प्रशासन निर्वासितांच्या संख्येकडे व युरोपच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. येत्या काळामध्ये प्रशासन या निर्वासितांपैकी काहींना सामावून घेणसाठी प्रयत्न करणार आहे.