शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या मदतीचे हात प्रशांत सागरापर्यंत

By admin | Updated: November 20, 2014 01:40 IST

भारताने बुधवारी प्रशांत महासागरातील देशांपर्यंत आपला मदतीचा हात पोहोचवला असून, फिजी या देशाच्या विकासासाठी मदत व कर्ज असे मिळून भारताकडून ८० दशलक्ष डॉलरची मदत वाढविण्यात आली आ

सुवा : भारताने बुधवारी प्रशांत महासागरातील देशांपर्यंत आपला मदतीचा हात पोहोचवला असून, फिजी या देशाच्या विकासासाठी मदत व कर्ज असे मिळून भारताकडून ८० दशलक्ष डॉलरची मदत वाढविण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिजीचे पंतप्रधान फ्रँक बैनीमिरामा यांची भेट घेतली. प्रशांत महासागरातील या देशासाठी १ कोटी डॉलरचा विशेष निधी मोदी यांनी जाहीर केला. सुवामध्ये मोदी यांचे जोरदार स्वागत झाले. ‘वुला मोदी’ (मोदींचे स्वागत) असे फलक जागोजाग लावले होते. या भेटीत मोदी यांनी प्रशांत महासागरातील १२ देशांची बैठक घेतली. फिजीच्या विद्यापीठात मोदी गेले. या विद्यापीठाला भेट देणारे मोदी हे पहिले जागतिक नेते ठरले. प्रशांत महासागरातील १२ देशांसाठी आयटीपीओच्या प्रदर्शनात जागा ठेवण्याचे तसेच नवी दिल्ली येथे व्यापारी कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले. प्रशांत महासागरातील देशांना दिली जाणारी १ लाख २५ हजार डॉलरची मदत २ लाख डॉलरपर्यंत वाढविण्यात आली. भारत व फिजी यांच्या संबंधातील ही नवी सकाळ आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षांचा बहिष्कारनरेंद्र मोदी यांचे भाषण फिजीच्या संयुक्त संसदेसमोर झाले. येथील विरोधी पक्षाने या भाषणावर बहिष्कार टाकला. फिजी सरकारने विरोधी पक्षांचा धन्यवाद प्रस्ताव मांडण्यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी भाषणावर बहिष्कार टाकला. पण फिजीचे पंतप्रधान वॉरेक बैनीमिरामा यांनी या बहिष्काराबद्दल माफी मागितली व विरोधकांचे हे वागणे अक्षम्य असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी, मी फिजीच्या जनतेच्या वतीने आपली जाहीर माफी मागतो, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)हे वर्तन अक्षम्य आहे. या प्रकाराचा भारत व फिजी यांच्या संबंधावर कोणताही परिणाम होणार नाही. आमच्यापैकी काहीजणांना लोकशाही, शासन कला व राष्ट्रीय धर्म याबाबत आणखी धडे देण्याची गरज आहे, हेच या घटनेने दाखवले आहे. १९८१ नंतर फिजीला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. १९८१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी फिजीला आल्या होत्या.