शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय कॉल सेंटर्सकडून अमेरिकनांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 02:37 IST

अमेरिकी नागरिकांची फसवणूक करणे आणि त्यांच्याकडून ३० कोटी डॉलर चोरल्याचा आरोप भारताच्या पाच कॉल सेंटरवर ठेवण्यात आला. अमेरिकेचे गृह सुरक्षा

वॉशिंग्टन : अमेरिकी नागरिकांची फसवणूक करणे आणि त्यांच्याकडून ३० कोटी डॉलर चोरल्याचा आरोप भारताच्या पाच कॉल सेंटरवर ठेवण्यात आला. अमेरिकेचे गृह सुरक्षा सचिव जेह जॉनसन यांनी ही माहिती दिली. जॉनसन यांनी सांगितले की, सर्व पाच कॉल सेंटरवर व ५६ नागरिकांवर आरोपपत्र निश्चित करण्यात आले आहे. यातील ३१ जण भारतीय आहेत. याशिवाय अमेरिकेत २० जणांना अटक करण्यात आली आहे. यातील बहुतांश भारतीय आहेत. ३० कोटी डॉलरची फसवूणक केल्याचा आरोप या आरोपींवर आहे. अहमदाबादच्या कॉल सेंटरच्या नेटवर्कमधून अमेरिकेतील गृह विभाग, अंतर्गत महसूल विभाग किंवा अन्य सरकारी अधिकारी असल्याचे सांगत फोन केला जात असे. खोटे अटक वॉरंट व जमा न केलेल्या आयकराच्या नावावर पेमेंट करण्याची मागणी केली जात होती. अहमदाबादच्या ज्या पाच कॉल सेंटरने हे कॉल केले त्यात एच ग्लोबल, कॉल मंत्रा, वर्ल्डवाईड सोल्युशन, जोरियान कम्युनिकेशन्स आणि शर्मा बीपीओ सर्व्हिसेस यांचा सहभाग आहे. (वृत्तसंस्था)१८ लाख नागरिकांना आले फसवणुकीचे कॉल्सट्रेझरी इन्स्पेक्टर जनरल फॉर टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (टीआयजीटीए) या कार्यालयाला आतापर्यंत १८ लाख नागरिकांनी सांगितले आहे की, त्यांना असे फसवणुकीचे कॉल आले होते, तर ९६०० पेक्षा अधिक नागरिकांनी सांगितले आहे की, त्यांची या माध्यमातून ५ कोटी डॉलरची फसवणूक झाली आहे. कॅलिफोर्नियातील एका व्यक्तीची तर १ लाख ३६ हजार डॉलर एवढ्या रकमेची फसवणूक झाली आहे.