शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अणुऊर्जेत गुंतवणूक होईल

By admin | Updated: February 10, 2015 22:53 IST

अणुउत्तरदायित्व प्रणालीबाबत भारत व अमेरिकेत सहमती झाल्यानंतर अमेरिकेने आपल्या कंपन्या भारताच्या अणुप्रकल्पांत भागीदार होतील,

वॉशिंग्टन : अणुउत्तरदायित्व प्रणालीबाबत भारत व अमेरिकेत सहमती झाल्यानंतर अमेरिकेने आपल्या कंपन्या भारताच्या अणुप्रकल्पांत भागीदार होतील, अशी आशा व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बेन ऱ्होड्स म्हणाले की, आवश्यक सहमती झाली असून ही प्रक्रिया सुरूच राहील, असे आम्ही मानतो. उत्तरदायित्व प्रणालीसंदर्भातील कोंडी फुटल्याने आमच्या कंपन्यांची चिंता दूर होईल आणि त्या भारतात भागीदारी करण्यास सज्ज होतील. नागरी अणुसहकार्य कराराच्या उत्तरदायित्वाबाबत अमेरिका व भारतात झालेल्या सहमतीबाबत भारत सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणाविषयी ऱ्होड्स यांना छेडण्यात आले. तेव्हा त्यांनी वरील आशा व्यक्त केली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी उत्तरदायित्व, नुकसानभरपाई व अणुदुर्घटनेच्या नुकसानभरपाई हक्कासह वादग्रस्त मुद्यांवर स्पष्टीकरण देणारे सात पानी निवेदन प्रसिद्धीस दिले होते. भारत-अमेरिका अणुसंपर्क गटात चर्चेच्या तीन फेऱ्यांनंतर धोरणात्मक अडथळ्यांवर सहमती झाली आहे. अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यावर येण्याच्या तीन दिवस आधी या गटाची बैठक झाली होती. ओबामांच्या भारत दौऱ्याचा उल्लेख करताना ऱ्होड्स म्हणाले की, आम्ही दौऱ्यादरम्यान म्हटल्याप्रमाणे कंपन्या स्वत:चा निर्णय स्वत: घेणार आहेत. त्या उत्तरदायित्व निधीच्या मुद्यावर विचार करणार आहेत. ओबामांच्या भारत दौऱ्यादरम्यान ऱ्होड्सही त्यांच्यासोबत आले होते. (वृत्तसंस्था)