शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

आयोडिन मिठाची लढाई भारताने जिंकली

By admin | Updated: August 10, 2015 16:47 IST

भारताने दिग्गज बहुराष्ट्रीय कंपनीविरुद्ध सुरू असलेल्या आयोडिनयुक्त स्वस्त मिठाच्या पेटेंटची लढाई जिंकली आहे. दांडीयात्रा काढून इंग्रजांविरुद्ध आंदोलन छेडणारे महात्मा गांधी आज हयात असते तर त्यांनाही

नवी दिल्ली : भारताने दिग्गज बहुराष्ट्रीय कंपनीविरुद्ध सुरू असलेल्या आयोडिनयुक्त स्वस्त मिठाच्या पेटेंटची लढाई जिंकली आहे. दांडीयात्रा काढून इंग्रजांविरुद्ध आंदोलन छेडणारे महात्मा गांधी आज हयात असते तर त्यांनाही २१ व्या शतकातील या मिठाच्या सत्याग्रहाबद्दल अभिमान वाटला असता.दैनंदिन वापराच्या आयोडिनयुक्त मिठाच्या पेटेंटसाठी चालू असलेल्या कायदेशीर प्रदीर्घ संघर्षात गुजरातच्या भावनगर येथील सार्वजनिक क्षेत्रातील एका प्रयोगशाळेने बाजी मारली. ‘सेंट्रल सॉल्ट अ‍ॅन्ड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट’ (सीएमएमसीआरआर) या प्रयोगशाळेने हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) या बहुराष्ट्रीय कंपनीचे आव्हान मोडित काढले.१९३० मध्ये महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढून मिठाचा सत्याग्रह चालविल्याची परिणती भारताला स्वातंत्र्य मिळण्यात झाली. या सत्याग्रहाला ८५ वर्षे झाली असताना मिठाची लढाई कितीतरी पटीने वाढली होती. कायदेशीर लढाईतील यशामुळे भारताला बौद्धिक संपदा अधिकाराचे रक्षण करता येणार आहे. प्रदीर्घ कायदेशीर संघर्ष सदर प्रयोगशाळेची मूळ शाखा असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) २००४ मध्ये नव्या आणि उत्कृष्ट दर्जाच्या आयोडिनयुक्त मिठाच्या उत्पादनाच्या पेटेंटसाठी अर्ज केला होता. तेव्हापासूनच कायदेशीर लढाईला प्रारंभ झाला. २००६ मध्ये तत्कालीन हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड सध्याची एचयूएलने पेटेंटला विरोध केला होता. सीएसआयआरने नावीन्यपूर्ण असे काहीही केले नसल्याने पेटेंट रद्द करण्याची मागणी या कंपनीने केली. चढउताराचा हा कायदेशीर संघर्ष दीर्घकाळ सुरूच राहिला. २०१३ मध्ये भारतीय पेटेंट कार्यालयाने पेटेंट देण्यास नकार दिला. त्यामुळे एचयूएलने लढाई जिंकल्यात जमा होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)